नागपूर : महिलांचे लैंगिक शोषण आणि बलात्कारच्या घटनांमध्ये देशात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आहे. महिलांवरील अत्याचारांमध्ये मुंबई, पुणे आणि नागपूर या शहरांचा पहिल्या तीन शहरांमध्ये समावेश आहे. कायदा व सुव्यवस्था कायम राखण्यात तीनही शहरातील पोलिसांनी अपयश आले असून गुन्हेगारांमध्ये पोलिसांचा वचक नाही. त्यामुळे गुन्हेगारी फोफावली आहे. यामध्ये तरुणी, महिला आणि मुलींवर लैंगिक अत्याचार, विनयभंगासारख्या गुन्ह्यांमध्ये वाढ झाली आहे.
दुकानातून घरी परत येत असलेल्या १० वर्षीय मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून बलात्कार केल्याची घटना उपराजधानीत घडली. याप्रकरणी ५५ वर्षीय व्यक्तीवर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. या घटनेमुळे तरुणी, महिलांसह लहान मुलीसुद्धा सुरक्षित नसल्याचे वातावरण निर्माण झाले आहे.
वाडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारे दाम्पत्य मोलमजुरी करतात. त्यांना १० वर्षे वयाची मुलगी असून ती पाचव्या वर्गात शिकते. ती शनिवारी दुपारी १२ वाजता ‘मॅगी’ आणण्यासाठी दुकानात गेली होती. दुकानातून परत येत असताना चरणदास उसन मेश्राम (५५) याने तिला चॉकलेटचे आमिष दाखवून सोबत नेले. एका झुडूपात नेऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर त्याने तेथून पळ काढला.
ती मुलगी रडत रडत घरी आली. शेजारी राहणाऱ्या महिलेने तिची विचारपूस केली असता तिने पोट दुखत असल्याचे सांगितले आणि घडलेला प्रकार सांगितला. त्या महिलेने मुलीच्या आईला फोन केला. मुलीची आई आल्यानंतर तिने मुलीची अवस्था बघून डॉक्टरांकडे नेले. उपचार घेतल्यानंतर थेट पोलीस ठाण्यात मुलीसह पोहचली. पोलिसांनी तक्रारीवरून गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली.
उपराजधानीतील गुन्ह्यांची स्थिती
बलात्कारवर्ष – घटना
२०१९ – १८३
२०२० – १७२
२०२१ -१७०
पोक्सो गुन्हे
२०१९ -२००
२०२० – २३८