मृत्यू अंकेक्षण नंतरच स्पष्टता
उपराजधानीत सर्दी, खोकला, तापाचे रुग्ण असल्याने ‘एच ३ एन २’ या विषाणूने धुमाकूळ घातल्याची शंका आहे. या विषाणूचे रुग्ण वाढत असताना एका ७८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू एका खासगी रुग्णालयात झाला आहे. मात्र, आरोग्य विभागाने ‘मृत्यू अंकेक्षण’ झाल्यावरच या मृत्यूबाबत स्पष्टता येणार असल्याचे सांगितले.
हेही वाचा >>>वाशीम : अनंतराव देशमुख समर्थकांसह भाजपात; पुत्र ॲड. नकुल, चैतन्य यांचाही पक्षप्रवेश
महानगरपालिकेच्या हद्दीतील ७८ वर्षीय रुग्णावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. प्राप्त माहितीनुसार, रुग्णाला ‘क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज’ (सीओपीडी), मधुमेह, उच्चरक्तदाबासारख्या सहव्याधी होत्या. आरोग्य सेवा उपसंचालक (नागपूर सर्कल) डॉ. विनिता जैन यांनी सांगितले की, बुधवारी ‘डेथ ऑडिट’ समितीसमोर हे प्रकरण आल्यावर व त्यांनी मान्यता दिल्यावरच या मृत्यूची ‘एच३एन२’ म्हणून नोंद होईल.