चंद्रपूर: शहरात अस्वलीने शिरकाव केला असून पहाटे फिरायला गेलेल्या प्रेमदास मारोती रामटेके यांच्यावर अस्वलाने हल्ला केला. यात रामटेके गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू आहेत. वाघ, बिबट, अस्वल या वन्य प्राण्यांच्या शहरातील आगमनाच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. वन्यप्राणी शहरात येत असल्याने दहशत व भीतीचे वातावरण आहे.

आज शुक्रवारी पहाटे पाच वाजताचे सुमारास छत्रपती नगर येथे वास्तव्याला असलेले प्रेमदास रामटेके विद्या विहार कॉन्व्हेन्ट परिसरात फिरायला गेले होते. यावेळी झाडीत लपून बसलेल्या अस्वलाने त्यांच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात रामटेके गंभीर जखमी झाले.

हेही वाचा… गोंदिया: महामार्गावर कब्जा करणाऱ्या ट्रक चालकांना आधी गुलाब पुष्प, नंतर कडक कारवाई

लोकांना बघून अस्वल तिथून पळून गेले. गंभीर अवस्थेत रामटेके यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारसाठी दाखल केले आहे. या घटनेची माहिती वन विभागाला देण्यात आली. वन कर्मचारी अस्वलीचा शोध घेत आहेत.

Story img Loader