भंडारा : अनेकदा पोलीस स्टेशनची पायरी चढायला नको असं म्हटलं जातं. मात्र एका अस्वलाने चक्क पोलीस ठाण्याची पायरी चढण्याचं धाडस दाखवले आहे. आता प्रश्न हा आहे की हे अस्वल नेमके कशासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले असेल ? कुणी म्हणत की प्राण्यांवर होणाऱ्या अत्याचाराची तक्रार करायला तर कोण म्हणतं जंगल सफारी करून कंटाळा आला म्हणून गाठलं असेल पोलीस ठाणं. कारण काय हे मात्र माहीत नाही पण अस्वलाने पोलीस ठाण्यात जाऊन एक फेरी मारल्याची घटना समोर आली आहे. ही घटना घडली आहे लाखांदूर तालुक्यातील दिघोरी मोठी पोलीस ठाण्यात.

रात्रीच्या वेळी जंगलातून भटकत भटकत एक अस्वल दिघोरी मोठी पोलीस ठाण्यात पोहोचले आणि अस्वल, पाहून अधिकारी, कर्मचाऱ्यांची बोबडी वळली, एकच पळापळ झाली, अखेर काही काळानंतर अस्वलीने जंगलाच्या दिशेने पळ काढला आणि सर्वांनी सुटकेचा निःश्वास टाकला. या घटनेची चित्रफीत प्रसारित झाली असून जिल्ह्यात अशी पहिली घटना असल्याने चर्चेला उधाण आले आहे.

Suresh Dhas On Santosh Deshmukh
Suresh Dhas : “आका हा सोपा आका नाही, ठराविक लोकांना प्रत्येक महिन्याला…”, आमदार सुरेश धस यांचा गंभीर आरोप
Pompeii
Pompeii: २५०० वर्षांपूर्वी भारतीय लक्ष्मी इटलीमध्ये कशी पोहोचली?
Zebra vs Crocodile fight video zebra escaped from crocodiles jaws netizens were shocked video goes viral
“नशीब नाही प्रयत्नांचा खेळ” मगरीच्या जबड्यातून असा निसटला झेब्रा; VIDEO पाहून डोळ्यांवर विश्वास बसणार नाही
Chandrapur, bribe, police sub-inspector,
चंद्रपूर : ५० हजाराची लाच, पोलीस उपनिरीक्षक प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात
Eknath Shinde on Santosh Deshmukh Murder Case
Eknath Shinde: “कुणाचेही लागेबंधे असले तरी…”, संतोष देशमुख प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा इशारा
monkey
थेट एसटी बसच्या छतावर बसून माकडाचा ऐटीत प्रवास! Viral Video पाहून नेटकरी म्हणे, “तिकीट काढले का?”
Forest Minister Ganesh Naik was upset with officials response and warn to forest officials
अधिकाऱ्यांच्या उत्तराने वनमंत्री नाराज, वनाधिकाऱ्यांना दिली तंबी…
Suresh Dhas On Santosh Deshmukh Case
Suresh Dhas : ‘पुण्यात ७ दुकानं, १५ कोटींचा संपूर्ण मजला…’, आमदार सुरेश धसांचा ‘आका’कडील संपत्तीबाबत मोठा दावा

हेही वाचा – बुलढाणा : पवित्र नात्याला कलंक! अल्पवयीन मुलीवर नराधम पित्याचा अत्याचार, न्यायालयाने सुनावली ‘ही’ कठोर शिक्षा

लाखांदूर तालुक्यातील दिघोरी/मोठी संकुलातील विविध गावांच्या परिसरात मोठ्या प्रमाणात घनदाट जंगल आहे. या जंगलात विविध वन्य प्राण्यांचा संचार असतो. तथापि, साकोली-वडसा राष्ट्रीय महामार्गालगतच्या विविध गावांतील घनदाट जंगलातील काही वन्य प्राणी दिघोरी/मोठी परिसरात प्रवेश करीत असल्याच्या घटना घडत असतात. शेत शिवारातही अनेकदा या अस्वलीचे दर्शन झाल्याच्या चर्चा रंगू लागल्या आहेत.

प्राप्त माहितीनुसार, घटनेच्या रात्री ८ वाजताच्या सुमारास दिघोरी/मोठी पोलीस ठाण्यातील सर्व पोलीस कर्मचारी आपल्या कार्यालयीन कामात व्यस्त होते. त्याचवेळी जंगलातून भटकलेले एक अस्वल अचानक पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या आवारात घुसले. पोलीस ठाण्याच्या इमारतीच्या आवारात अस्वल घुसल्याचे लक्षात येताच ठाण्यात पळापळ सुरू झाली. काय करावे कुणालाही सुचेना. पोलीस कर्मचाऱ्यांचीही भांबेरी उडाली. वन विभागाला सूचना देण्यात आली. मात्र काही काळानंतर मार्ग चुकल्याचे लक्षात येताच अस्वलीने पुन्हा जंगलाच्या दिशेने पळ काढला. अस्वल गेल्याचे लक्षात येताच पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.

हेही वाचा – शरद पवारांची ‘ती’ ऑफर ‘या’ खासदाराने नाकारली, नेमकं काय घडलं? जाणून घ्या

दरम्यान पोलीस ठाण्यात अस्वल घुसल्याची वार्ता गावात वाऱ्यासारखी पसरली आणि चर्चांना उधाण आले. या परिसरात रात्रीच्या वेळी विविध वन्य प्राणी जंगलातून भटकून गावात घुसण्याच्या घटनांमुळे नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. कर्तव्यावर असणाऱ्या पोलिसांनी धैर्य दाखवत त्याचा सामना केला आहे. तर नागरिकांना सुरक्षित राहण्याची आणि सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आले आहे. अस्वल पोलीस ठाण्याच्या हद्दीत वावरत असल्याची चित्रफीत सध्या चांगलीच प्रसारित होत आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांमध्येही भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले आहे.

लाखांदूर वन परिक्षेत्राअंतर्गत लाखांदूर आणि दिघोरी (मोठी) असे दोन वनपरिक्षेत्र येतात. सानगडी ते लाखांदूर आणि लाखांदूर ते वडसा असे मोठे क्षेत्र जंगल व्याप्त आहे. या परिसरात वाघ, बिबट, अस्वल आणि मुख्यत्वे लांडग्यांची संख्या फार मोठी आहे. त्यामुळे या भागात विशेष खबरदारी घेण्याची गरज असते. तेंदुपत्ता संकलन आणि मोहफुले वेचण्यासाठी गेलेल्या मजुरांवर अस्वलीने हल्ला केल्याच्या घटनाही परीसरात घडत असतातच. त्यामुळे वन विभागामार्फत वन क्षेत्रालगतच्या गावातील मजुरांना खबरदारीच्या सूचना देण्यात येतात.

या आधी भंडारा, पवनी वन परिक्षेत्रअंतर्गत भंडारा, विरली खंदार, खमारी बुटी अशा काही ठिकाणी अस्वल किंवा अस्वलीचे पिल्लू घरात शिरल्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र पोलीस ठाण्यात अस्वल घुसल्याची जिल्ह्यातील ही पहिलीच घटना असल्याचे बोलले जात आहे. या घटनेनंतर परिसरातील नागरिकांनीही धसका घेतला आहे.

Story img Loader