वर्धा : गाढ झोपेत असलेल्या आईस लाकडी दांड्याने सतत प्रहार करीत खून केल्याची घटना सोमवारी उजेडात आली. आर्वी तालुक्यातील मातोडा या गावातील घटनेने पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. हेमराज महादेव तुमसरे असे आरोपी मुलाचे नाव आहे.त्याची आई कौशल्याबाई महादेव तुमसरे वय ८२ या दोन्ही पायाने अपंग असून जमिनीवर घासत चालायच्या. आरोपी त्यामुळे चिडचिड करायचा.त्याची पत्नी व मुलगी हे घटनेच्या रात्री काकाकडे झोपण्यास गेल्या.

विद्युत पुरवठा खंडित झाल्याने प्रणिता तुमसरे यांना जाग आली. तेव्हा त्या घराबाहेर पडल्यावर त्यांना सासुस दांडक्याने नवरा मारहाण करीत असल्याचे दिसून आले. तिने ही घटना जाऊ मीराबाई यांना सांगितली.त्यांनी जावून पाहताच कौशल्याबाई मृत झाल्याचे दिसून आले.याची तक्रार पत्नी प्रणिता यांनी आर्वी पोलीसांकडे केली.आरोपी मुलगा हेमराज यास सायंकाळी अटक करण्यात आली असून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी उपजिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आला आहे.

Story img Loader