नागपूर – उत्तर नागपुरातील हबीब नगर नवीन वस्ती टेका नाका येथे चांभार नाल्याच्या किनाऱ्यावर असलेली दोन मजली इमारत रात्री उशिरा कोसळली.
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Already have a account? Sign in
चांभार नाल्याच्या शेजारी असलेल्या या दोन मजली जीर्ण इमारतीमध्ये मुश्ताक अहमद अन्सारी यांचे कुटुंब राहत होते. ही इमारत जीर्ण झाली होती. कुठल्याही क्षणी पडू शकते त्यामुळे या इमारतीतले लोक आधीच बाहेर पडले होते. त्यांनी घरातील सामान बाहेर काढले होते. रात्री अकराच्या सुमारास ही दोन मजली इमारत मागे असलेल्या नाल्यात कोसळली.
या घटनेत जीवितहानी झालेली नाही आणि कोणीही जखमी झाले नसल्याचे अग्निशमन विभागाचे अधिकारी संजय रहाटे यांनी सांगितले. रात्री उशिरा नाल्यातील पडलेला मलबा उचलण्याचे काम सुरू झाले.
First published on: 02-08-2023 at 09:03 IST
Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A building collapsed in the midnight in nagpur vmb 67 ssb