अमरावती : शहरातील ‘मिलन मिठाई’ या प्रतिष्‍ठानाचे संचालक अशोक होशियारसिंह शर्मा (६२, रा. महेश नगर, बडनेरा रोड) यांनी स्‍वत:च्‍या छातीत बंदुकीने गोळी झाडून आत्‍महत्‍या केल्‍याची घटना रविवारी रात्री उशिरा उघडकीस आली. अशोक शर्मा हे गेल्‍या काही महिन्‍यांपासून पायाच्‍या व्‍याधीने त्रस्‍त होते. त्या व्‍याधीला कंटाळल्‍यामुळेच त्‍यांनी आत्‍म‍हत्‍या केल्‍याची प्राथमिक माहिती राजापेठ पोलिसांनी दिली.

अशोक शर्मा यांचे कुटुंबीय सायंकाळी मंदिरात दर्शनासाठी गेले होते. त्‍यावेळी कुटुंबीयांनी त्‍यांना सोबत चालण्‍याचा आग्रह केला होता, पण ते घरीच थांबले. घरी कुणी नसल्‍याची संधी साधून अशोक शर्मा यांनी जीवनयात्रा संपविली. अशोक शर्मा यांच्‍याकडे जुन्‍या पद्धतीची मोठी बंदूक होती. या बंदुकीनेच त्‍यांनी स्‍वत:वर गोळी झाडली. त्‍यांचे कुटुंबीय घरी परतल्‍यानंतर ही घटना उघडकीस आली.

D Gukesh Raj Thackeray
Raj Thackeray : जगज्जेता डी गुकेशसाठी राज ठाकरेंची खास पोस्ट; म्हणाले, “बुद्धिबळाचा हा खेळ…”
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Seven maoists killed in abhujmad encounter
गडचिरोली : अबुझमाडमध्ये जवान व नक्षल्यांमध्ये जोरदार चकमक;  सात नक्षल्यांना कंठस्नान
Police arrest one for black marketing commercial gas Pune news
व्यावसायिक गॅसचा काळाबाजार उघड; पोलिसांकडून सिलिंडरच्या ७२ टाक्या जप्त, एकाला अटक
combing operation parabhani
Parbhani : परभणीत रात्री पोलिसांकडून कोंबिंग ऑपरेशन? पोलीस म्हणाले, “परिस्थिती नियंत्रणात आणताना…”
nana patole
पैशाच्या जोरावर लोकशाही विकत घेण्याचा प्रयत्न म्हणजेच ‘ऑपरेशन लोटस’,पटोलेंचा घणाघात
Santosh Deshmukh Murder Case
“…म्हणून माझ्यावर ही वेळ आली का?” मयत सरपंच संतोष देशमुखांच्या आईचा टाहो; पत्नी म्हणाली, “ते १५ वर्षांपासून..”
pune police commissioner amitesh kumar
“४५० ठिकाणचे CCTV, अपहरणासाठी वापरलेली कार अन्…”, पोलीस आयुक्तांनी सांगितलं सतीश वाघ यांच्या मारेकऱ्यांना कसं पकडलं?

हेही वाचा – बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, काही ठिकाणी पावसाची शक्यता, देशातील हवामानात बदल, तापमानात घट

हेही वाचा – अमरावती परिक्षेत्रात लाचखोरीच्या प्रकरणांची पंचाहत्‍तरी

पोलिसांना घटनेची माहिती देण्‍यात आली. काही दिवसांपूर्वीच त्‍यांच्‍या पायावर शस्‍त्रक्रिया करण्‍यात आली होती. तरीही त्‍यांचे पायाचे दुखणे कमी झाले नव्‍हते, त्‍यामुळे ते त्रस्‍त होते, अशी माहिती त्‍यांच्‍या कुटुंबीयांनी दिली. राजापेठ पोलीस घटनेचा तपास करीत आहेत.

Story img Loader