सीए (सनदी लेखापाल)च्या अभ्यासक्रमात शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थ्याने इमारतीच्या ६ व्या माळ्यावरून उडी घेऊन आत्महत्या केली. ही घटना इमामवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत सोमवारी मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास घडली. हर्ष अमित राजा (२१) रा. टाटा कॅपिटल्स हाईट्स, टॉवर ३ असे मृताचे नाव आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा >>>नागपूर : जुन्या पुलावर क्षमतेपेक्षा अधिक लोक असल्याने दुर्घटना – अभियंते विनोद पात्रिकर

हर्षचे वडील अमित सनदी लेखापाल आहेत. तर त्याची आई गृहिणी आहे. हर्ष आपल्या वडिलांप्रमाणे सीए बनणार होता. त्यासाठी त्याने ‘सीए’च्या अभ्यासक्रमात प्रवेश घेऊन तयारी सुरू केली होती. परीक्षा तोंडावर असल्याने तो गेल्या दोन महिन्यापासून लॅपटॉप आणि मोबाईल सुद्धा वापरत नव्हता. संपूर्ण वेळ तो अभ्यासाला देत होता. घटनेच्या वेळी तो इमारतीच्या छतावर गेला. ६ व्या माळ्यावरून उडी घेतली.

हेही वाचा >>>नागपूर : चिंताजनक! शहरात ९०० हून अधिक इमारती जीर्ण

सकाळी ५ वाजताच्या सुमारास सुरक्षा रक्षकाला तो रक्तबंबाळ अवस्थेत खाली पडून दिसला. त्याने लागलीच रहिवाशांना माहिती दिली. त्यानंतर पोलिसांना सूचना करण्यात आली. पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन हर्षला खासगी रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले.

हेही वाचा >>>नागपूर जिल्हा परिषदेच्या विषय समित्यांवर काँग्रेसचे वर्चस्व ; काँग्रेसचे तीन व राष्ट्रवादी काँग्रेसचा एक सभापती

घटनास्थळी पोलिसांनी कोणतीही सुसाईट नोट सापडली नाही. त्यामुळे त्याने नेमकी कोणत्या कारणातून आत्महत्या केली. याचा उलगडा होऊ शकला नाही. मात्र, तो अभ्यासाच्या तणावात होता. त्यातूनच त्याने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A ca student ended his life by jumping from the 6th floor amy