बुलढाणा: वाढदिवसाला तलवारीने केक कापून तो समाजमाध्यमावर सार्वत्रिक करणे चौघांना भलतेच महागात पडले! ‘बर्थ डे बॉय’सह त्याच्या मित्रांविरुद्ध गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मोताळा तालुक्यातील धामणगाव बढे येथे हा चोघांना धडा शिकविणारा अन इतर युवकांना धडा देणारा घटनाक्रम घडला. धामणगाव बढे येथील रमेश सपकाळ यांचा वाढदिवस धुमधडाक्यात साजरा करण्याचे मित्रमंडळाने ठरविले. त्याप्रमाणे तो थाटात ‘एन्जॉय’ देखील करण्यात आला. मात्र केक धारधार तलवारीने कापणे व ‘इन्स्टाग्राम आयडी’ वर ‘शेअर करणे त्यांना महागात पडले. ही तलवारबाजी वेगाने ‘व्हायरल’ झाली अन पोलीस दादांच्याही नजरेत आली. याची गंभीर दखल घेत धामणगाव बढे पोलीस ठाण्याचे ठाणेदार यांनी कारवाईचे आदेश दिले.

हेही वाचा… साहित्य खरेदीचे कारण अन् १३ जणांनी बँकेलाच घातला गंडा

पोलीस कर्मचारी नितीन इंगळे यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली. प्रकरणी रमेश सपकाळ, सागर काटे, राहुल काटे, अविनाश वाघ यांच्याविरुद्ध शस्त्र कायद्याच्या कलम ४, २५ तसेच मुंबई पोलीस कायद्यानुसार गुन्हा दाखल केला आहे.