लोकसत्ता टीम

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अमरावती: धार्मिक तेढ निर्माण करण्‍याच्‍या उद्देशाने समाजमाध्‍यमाद्वारे आक्षेपार्ह व्हीडिओ व्हायरल केल्‍याप्रकरणी गाडगेनगर पोलिसांनी दोन जणांच्‍या विरोधात भारतीय दंड विधानाच्‍या कलम ५०५ (२) अन्‍वये गुन्‍हा दाखल केला आहे.

मधुकर उमेकर (रा. राधानगर) आणि गोपाल गुप्‍ता (रा. बजरंग टेकडी) यांच्‍याविरूद्ध गुन्‍ह्याची नोंद करण्‍यात आली आहे. मधुकर उमेकर यांनी त्‍यांच्‍या मोबाईल व्‍हॉट्सअपवरील वनारसी नावाच्‍या समूहावर २६ सेकंदाचा एक आक्षेपार्ह व्हीडिओ प्रसारीत केला. हा व्हीडिओ अमरावती शहरातील नसतानादेखील तो अमरावतीचाच असल्‍याची अफवा पसरविण्‍यात आली.

हेही वाचा… लाल मिरची भडकली अन् नाकाला झोंबली, चढ्या किमतीने ग्राहकांचे तोंड पोळले…

या व्हीडिओत एक गट घोषणाबाजी करीत असल्‍याचे दिसत आहे. त्‍यामुळे धार्मिक तेढ निर्माण होऊन अमरावती शहरात संघर्ष होऊ शकतो, याची जाणीव असतानादेखील व्हीडिओ व्हायरल केल्‍याचा आरोप उमेकर आणि गुप्‍ता यांच्‍यावर आहे. अकोला येथील जातीय दंगलीच्‍या पार्श्‍वभूमीवर अमरावती पोलीस समाज माध्‍यमांवर बारकाईने लक्ष ठेवून आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has been registered against two people for making the offensive video go viral in amravati mma 73 dvr
Show comments