वर्धा: मालमत्तेच्या वादातून काय घडेल याचा नेम नसल्याचे म्हटले जाते. ही घटना तर थक्क करणारी आहे. एका महिला पोलीस शिपायाची स्थानिक गजानन नगरात राहणाऱ्या शुभांगी देशमुख सोबत ओळख होती. ती ड्यूटीवर असताना तिला शुभांगी हिने फोन करीत घरी बोलावले.

घरी येताच दार बंद करीत कर्मचाऱ्याचा हातातील ब्रेसलेट, अंगठ्या काढून घेतल्या. परत तीन महिला आल्या. चौघींनी मिळून परत शिपयाचा विनयभंग करीत मारहाण सुरू केली. त्या दरम्यान एकीने महिला शिपायाच्या मानलेल्या भावास फोन करून बोलावले. त्यालाही मारहाण केल्यानंतर त्याला त्याच्या प्रेयसीला फोन करण्यास दरडावले. एव्हढेच नव्हे तर प्रेयसीला तुझ्या प्रॉपर्टीवर प्रेम करतो, तुझ्यावर नाही असे बोलण्यास भाग पाडले.

300 crore extortion from female officer on fear of involvement in embezzlement Mumbai print news
३०० कोटींच्या गैरव्यवहारातील सहभागाची भीती दाखवून महिला अधिकाऱ्याकडून खंडणी उकळली; चौघांविरोधात गुन्हा
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
eight lakh rupees forgotten in a rickshaw returned to a female passenger In Kalyan
कल्याणमध्ये रिक्षेत विसरलेला आठ लाखाचा ऐवज महिला प्रवाशाला परत
BJP Party Worker Dead Body Found in Office
BJP Worker : भाजपा कार्यकर्त्याचा रक्ताने माखलेला मृतदेह कार्यालयात सापडल्याने खळबळ, महिला अटकेत; कुठे घडली घटना?
Advice from Uttar Pradesh State Commission for Women to male tailors
‘पुरुष शिंप्यांनी महिलांचे माप घेऊ नये’ ; उत्तर प्रदेश राज्य महिला आयोगाचा सल्ला
Murder of woman in Hadapsar area body was kept in bed compartment
हडपसर भागात महिलेचा खून, मृतदेह पलंगातील कप्यात ठेवल्याचे उघड
Five young women sold into prostitution with the lure of employment
नोकरीच्या आमिषाने कुंटणखान्यात पाच तरुणींची विक्री, गुन्हे शाखेकडून तरुणींची सुटका
Mumbai woman lost rupees 6 lakhs
मुंबई : ऑनलाईन वस्तू विकणे महागात, महिलेला लाखोंचा गंडा

हेही वाचा… श्रीमंत निवृत्तीसाठी गुंतवणूक पर्यायांच्या निवडीबाबत उद्या मार्गदर्शन; ‘लोकसत्ता अर्थभान’मधून मिळणार महत्त्वाची माहिती

प्रेयसी येताच तिला धमकी देत पोलीस शिपाई तसेच तिच्या भावास मारहाण करण्यास लावली. हा सर्व प्रकार सदर पीडित शिपायाने रामनगर पोलीस ठाण्यात जाऊन नमूद केला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलिसांनी शुभांगी देशमुख, पल्लवी राऊत, प्रीती महेश राऊत, शारदा राऊत, वैशाली टिपले, आविष्कार देशमुख, शैलेश राऊत, महेश राऊत यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे या घटनेत एक बाब आहे. या घटनेवेळी पोलीस शिपाई तिच्या मानलेल्या भावाच्या नावाने आधीच लिहून ठेवलेला मुद्रांक आणला. त्यावर स्वाक्षरी करण्यास भाग पाडले. याची वाच्यता केल्यास जिवे मारण्याची धमकी पण दिली. या दोघांना शैलेश राऊत याच्या कार मध्ये बसवून न्यायालयात नेले. तसेच नोटरी पण केली.

हेही वाचा… थकबाकी वसुलीसाठी आता ‘दामिनी’चा ‘वार’; सात हजारावर वीज ग्राहक रडारवर

त्यानंतर सोडून देण्यात आले. शिपाई व तिच्या भावास मारहाण करीत असताना काही महिलांनी मारहाणीचा व्हिडिओ काढला आहे. मारहाण कशाला करीत आहे, हे वारंवार विचारत असूनही कोणीच काही सांगत नव्हते. आरोपींनी शिपाई व तिच्या भावाच्या मोबाईल मधील डेटा पण डिलिट करून टाकला. या प्रकरणाची चांगलीच चर्चा सुरू झाली आहे. प्रकरण चौकशीत असून अद्याप कुणालाही अटक झाली नसल्याचे रामनगर पोलीसांनी सांगितले.