वाळू व गौणखनिजांच्या चोरी प्रकरणांत अकोल्याचे तहसीलदार सुनील पाटील व त्यांच्या पथकाने कारवाई केली. यावेळी वाळूमाफीयांनी शासकीय कामात अडथळा आणण्यासह तहसीलदार व पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर नेण्याचा प्रयत्न केला. पथकाला धक्काबुक्कीदेखील करण्यात आली. या प्रकरणी अकोट फाइल पोलीस ठाण्यात आठ आरोपींविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हेही वाचा >>>अमरावती : वाहनाच्या धडकेत बिबट्या जागीच ठार

Ritika Malu Hit and Run Case CID officers help accused
नागपूर : सीआयडी अधिकाऱ्यांची आरोपींना मदत; रितिका मालू ‘हिट अँड रन प्रकरण’
micro retierment
‘मायक्रो-रिटायरमेंट’ म्हणजे काय? तरुणांमध्ये का वाढतोय हा ट्रेंड?
Sahar Police registered case against passenger who smoked on plane during Abu Dhabi Mumbai journey
पोलीस अधिकाऱ्याला लाच देणारा एसीबीच्या जाळ्यात
Municipal corporation issues notice to 28 constructions violating air pollution control regulations
वायू प्रदूषण नियंत्रण नियमावलीचे उल्लंघन करणाऱ्या २८ बांधकामांना पालिकेची नोटीस
Eleven policemen on duty at the Welfare Court suspended kalyan news
कल्याण न्यायालयातील कर्तव्यावरील अकरा पोलीस निलंबित
pune traffic police loksatta news
पुणे: वाहतूक पोलिसांच्या कारवाईत खून प्रकरणातील आरोपीचा शोध
11 thousand crores to BEST in the last decade Mumbai Municipal Corporation administration rejects allegations of treating the initiative with contempt Mumbai print news
गेल्या दशकात ‘बेस्ट’ला ११ हजार कोटी; उपक्रमाला सापत्न वागणूक दिल्याचा आरोप मुंबई महानगरपालिका प्रशासनाला अमान्य
lure of marriage , pretending to be doctor,
सातारा : डॉक्टर असल्याचे भासवून लग्नाच्या आमिषाने अत्याचार, कराडमध्ये गुन्हा दाखल

अकोला-अकोट मार्गावर उगवा गावाजवळ मोर्णा नदीपात्रातून वाळूची अवैध वाहतूक होत असल्याची माहिती तहसीलदार सुनील पाटील यांना मिळाली. तहसीलदारांनी आपल्या ताफ्यासह घटनास्थळ गाठले. यावेळी वाळूचे अवैध उत्खनन सुरू असल्याचे आढळून आले. एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चार ते पाच मजूर नदी पात्रातून वाळू भरत होते. पथकाकडून त्यांना मनाई करण्यात आली. ट्रॅक्टरचा चालक व मालक निखील सुनील सरदार व आशीष सुनील सरदार, रा. उगवा यांनी ट्रॅक्टर नदीपात्रातून भरधाव वेगात रस्त्यावर आणला. वाहन थांबवण्याच्या सूचना दिल्यावर तहसीलदार पाटील व त्यांच्या पथकाच्या अंगावर ट्रॅक्टर आणण्याचा प्रयत्न आरोपींनी केला. तहसीलदार पाटील व महसूल सहायक संजय तिवारी यांनी कठडे पकडून धावत्या ट्रॅक्टरमध्ये प्रवेश केला. यावेळी तहसीलदारांनी गंभीर कारवाईचा इशारा दिल्यावर आरोपींनी ट्रॅक्टर थांबवला. चार ते पाच मजूर घटनास्थळावरून पसार झाले. ट्रॅक्टर पुन्हा घटनास्थळावर नेण्यास सांगितल्यावर आरोपींनी अधिकाऱ्यांशी वाद घालत धक्काबुक्की केली. आरोपींचे वडील सुनील पांडुरंग सरदार व आई सुनीता सुनील सरदार यांनी शासकीय कामात अडथळा आणून ट्रॅक्टर जप्त करण्यास मज्जाव केला. या प्रकरणी अकोट फैल पोलीस ठाण्यात दाखल तक्रारीवरून निखील सुनील सरदार, आशीष सुनील सरदार, सुनीता सुनील सरदार, सुनील पांडुरंग सरदार व अन्य चार अनोळखी अशा एकूण आठ जणांविरूद्ध भादंवि कलम ३५४, ३७९, २७९, ३३७, ५०४, ५०६, १८६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

…अन् तहसीलदारांनी स्वत:च चालवला ट्रॅक्टर
तहसीलदार सुनील पाटील व त्यांच्या पथकाने वाळूमाफीयांवर कारवाई केल्यावर ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केले. ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात नेण्यासाठी चालक उपलब्ध होत नव्हता. त्यामुळे तहसीलदार सुनील पाटील यांनी स्वत: सारथ्य करीत ट्रॅक्टर रामदासपेठ पोलीस ठाण्यात नेला.

Story img Loader