नागपूर : अंबाझरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन पाडल्याप्रकरणी गरुडा ॲम्युझमेंट पार्क या कंपनीच्या संचालकांविरुद्ध अखेर सोमवारी अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने (एमटीडीसी) अंबाझरी उद्यान आणि स्मारकाची ४४ एकर जमीन विकसित करण्यासाठी गरुडा कंपनीला ३० वर्षांसाठी भाडेतत्त्वावर दिली आहे. या कंपनीच्या संचालकांनी हे भवन उद्ध्वस्त केल्याचा आरोप आहे. भवन पडणाऱ्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक बचाव समिती ११६ दिवसांपासून अंबाझरी उद्यानाजवळ आंदोलन करीत आहे. या आंदोलनाचे लोन शहरातील इतर भागात पसरत आहे.

हेही वाचा – नागपूर : ओबीसी, व्हीजेएनटींना प्रशिक्षणासह रोजगारक्षम बनवण्यावर भर; ‘महाज्योती’चे व्यवस्थापकीय संचालक राजेश खवले यांची माहिती

नागपुरात गेल्या तीन दिवसांपासून आंदोलन सुरू झाले आहे. आंदोलकांनी अंबाझरी पोलिसांकडे अनेकदा तक्रारदेखील केली होती. परंतु, पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही. त्यामुळे समितीने न्यायालयात धाव घेतली होती.

हेही वाचा – नागपूर : राज्यात प्रथमच बाळ विक्री करणाऱ्या टोळीवर ‘मकोका’; तब्बल ५८ आरोपी

प्रथम श्रेणी न्याय दंडाधिकारी, नागपूर यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्याविरोधात गरुडाच्या संचालकांनी जिल्हा व सत्र न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल केली होती. न्यायालयाने ही याचिका फेटाळली. त्यामुळे संचालक नरेंद्र जिचकार, प्रवीण अग्रवाल, प्रवीणकुमार जैन आणि शिंदे यांच्या विरोधात अंबाझरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A case has finally been filed against those who demolished dr ambedkar bhavan in nagpur rbt 74 ssb
Show comments