वर्धा : बियाण्याचा काळाबाजार ऐकायला मिळतो. पण देतो म्हणून आश्वासन देत चक्क फसवणूक पदरात टाकणारा हा किस्सा वेगळाच ठरावा.

हेही वाचा – गृहमंत्र्यांच्या शहरात खून आणि इतर गंभीर गुन्हे वाढले, २०२२ च्या तुलनेत २०२३ चे चित्र वाईट

हेही वाचा – नववर्षातील हुडदंग थांबवण्यासाठी नागपुरात २ हजार पोलिसांचा बंदोबस्त; मद्यपींना आवरण्यासाठी ‘ही’ योजना

स्थानिक स्नेहलनगर येथे राहणारे आकाश प्रमोद शेंडे तसेच नरेश खाडे यांनी एकूण २६ लाख ६१ हजार रुपये किंमतीची बियाणे खरेदीचा सौदा केला. दिल्ली येथील जसवंत सिंग, कमलेंद्रा सिंग व साधना देवी यांनी विविध आमिष दाखवीत फोन केले होते. त्यास बळी पडून हा सौदा शेंडे व खाडे यांनी केला होता. दोघांनी पैसे पाठविले. मात्र अनेक दिवस लोटूनही बियाणे मिळालेच नाही. शेवटी आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर शहर पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार तीनही आरोपींविरोधात गुन्हे दाखल झाले आहेत. दिल्लीच्या ठगांनी केलेली ही फसवणूक चांगलीच चर्चेत आहे.

Story img Loader