लोकसत्ता प्रतिनिधी

नागपूर: बनावट ‘गेमींग अ‍ॅप’ तयार करून देशभरातील हजारो गुंतवणुकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या गोंदियाच्या अनंत जैनवर ‘मनी लाँडरिंग’चा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. जैनच्या घरातून पोलिसांनी १५ किलो सोने, ३०० किलो चांदी आणि १६ कोटींची रोख जप्त केली होती. सोमवारी दुपारी १७ कोटी रुपये पोलिसांच्या सुरक्षा ठेव खात्यात जमा करण्यात आले.

stock market fraud loksatta
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने ८७ लाखांची फसवणूक
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
person took 1 85 crores and absconded with his family after luring investors with interest
नागपुरात आणखी एक महाघोटाळा! अडीच हजार लोकांचे कोट्यवधी…
pimpri chinchwad cyber police busted gang operating through China, Nepal crime news
चीन, नेपाळमधून सायबर फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश
Fraud with Sarafa by pretending to be policeman Steal gold chain
पोलीस असल्याच्या बतावणीने सराफाची फसवणूक; सोनसाखळी चोरून चोरटा पसार
Stock market investment bait, fraud, Pune,
पुणे : शेअर बाजारात गुंतवणुकीच्या आमिषाने २६ लाखांची फसवणूक
life insurance fraud pune marathi news
पुणे: आयुर्विमा पॉलिसीच्या नावाखाली तरुणीची १३ लाखांची फसवणूक
How much money can be carried during elections
महत्त्वाचे! निवडणूक काळात ‘किती’ पैसे बाळगता येतात, जाणून घ्या…

क्रिकेट बुकी अनंत जैन याने बनावट ‘गेमींग अ‍ॅप’ तयार करुन अनेकांना लिंक पाठवून जुगार खेळण्यास प्रोत्साहन दिले. पहिल्यांदा खेळणाऱ्यांना लगेच जिंकवून देत दुप्पट-तिप्पट रक्कम परत केली. मात्र, मोठी रक्कम लावल्यानंतर सॉफ्टवेअरमध्ये बदल करुन पैसे हरविल्या जात होते. अशाच पद्धतीने नागपुरातील व्यापारी विक्रांत अग्रवाल यांनाही लिंक पाठवून ऑनलाईन जुगार खेळण्यास सांगितले. त्यांना सुरुवातीला ८ ते १० लाख रुपये नफा दिल्यानंतर तब्बल ५८ कोटी रुपयांनी हरविण्यात आले.

हेही वाचा… वाशीमच्या ‘या’ गावात लोकप्रतिनिधींना ‘नो एंट्री’ कारण काय, वाचा…

बनावट लिंक असल्याचे लक्षात येताच अग्रवाल यांनी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्याकडे धाव घेतली. या प्रकरणी पोलीस निरीक्षक शुभांगी देशमुख, सहायक निरीक्षक मयूर चौरसीया आणि पोलीस उपनिरीक्षक बलराम झाडोकार यांच्या पथकाने छापा घातला. अनंत जैनच्या घरातून कोट्यवधीचे घबाड पोलिसांच्या हाती लागले. या प्रकरणात आता पोलीस ‘मनी लाँडरिंग’चा गुन्हा दाखल करण्याची माहिती समोर आली आहे.

आयकर विभागही करणार चौकशी

अनंत जैन याच्याकडे जवळपास २०० ते ३०० कोटींची मालमत्ता आहे. कोटींमध्ये रोख रक्कम होती. ही रक्कम कशी व कुठून आली? याबाबत आयकर विभाग चौकशी करणार आहे. अनंत जैन याचे गोंदियात जवळपास ५ एकर जमीनीवर २०० कोटी रुपये खर्च करून टोलेजंग बंगल्याचे बांधकाम सुरु आहे. जैन याने कोट्यवधीची रोख नातेवाईकांच्या घरात ठेवली असून पत्नीच्या नातेवाईकांच्या नावाने अनेक ठिकाणी जमीन विकत घेतल्याची माहिती आहे.

तांदळाचा व्यापार केला बंद

मूळचे गोंदिया येथील असलेले विक्रांत अग्रवाल यांची आरोपी अनंत जैनशी मैत्री होती. विक्रांत यांनी नागपुरात तांदूळ आयात-निर्यातीचा व्यवसाय सुरु केला होता. मात्र, तो व्यापार बंद करून विक्रांत यांनी पैसे बँकेत ठेवले होते. ही बाब आरोपी जैनला माहिती होती. त्याने बनावट लिंक पाठवून अग्रवाल यांची ५८ कोटींनी फसवणूक केली. तसेच अग्रवाल यांच्या काही मित्रांनाही जाळ्यात ओढून फसवणूक केल्याची माहिती समोर आली आहे.