यवतमाळ : पुसद येथील वसंतनगर पोलीस ठाण्यांतर्गत येणाऱ्या एका कॉन्व्हेंटमधील शिक्षकाविरुद्ध बलात्कारासह पोक्सो व विविध कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपी शिक्षकाला पोलिसांनी अवघ्या एका तासात अटक करुन त्याची २७ जूनपर्यंत कोठडी घेतली आहे.पुसद येथील कारला मार्गावरील एका कॉन्व्हेंटमधील शाळेतील शिक्षकाने कोविडच्या काळात व्हॉट्सअपवर ऑनलाइन शिक्षणाचा फायदा घेऊन एका मुलीशी जवळीक साधली. त्यानंतर तिला विविध आमीष दाखवून प्रेमाच्या जाळ्यात ओढले व लैंगिक अत्याचार केले.

शिक्षकाकडून त्रास वाढल्याने मुलीने आपल्या पालकांना याबाबत सांगितले. त्यानंतर शिक्षकविरुद्ध वसंतनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली. पोलिसांनी शिक्षकाविरुद्ध भादंवि कलम ३७६ (२) एफएन (१), ३७६ (३), पोक्सो ४, ६, १० नुसार गुन्हा दाखल केला. आरोपी शिक्षक आदित्य ऊर्फ मंगेश शंकर वाठोरे यास पोलिसांनी अटक केली. त्याला न्यायालयासमोर हजर केले असता २७ जूनपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या घटनेने पुसदच्या शैक्षणिक वर्तुळात खळबळ उडाली आहे.

state government decision 50 thousand teachers will get 20 percent subsidy increase
शिक्षकांसाठी मोठी बातमी! वेतनात २० टक्के वाढ होणार?
Madhuri Dixit Refused Darr Offer Do You Know The Reason?
Madhuri Dixit : डर चित्रपट माधुरी दीक्षितने का…
Sexual assault on three year old girl in Ghatanji Yavatmal crime news
यवतमाळ: संतापजनक! तीन वर्षीय चिमुकलीवर लैंगिक अत्याचार
Mira Road Riot Case, Bail to 14 Muslim Youths,
मीरा रोड दंगल प्रकरण : १४ मुस्लिम तरुणांना उच्च न्यायालयाकडून जामीन
Supreme Court News
Supreme Court : कामाच्या ठिकाणी भेदभाव झाल्याचा ट्रान्सवुमन शिक्षिकेचा आरोप, सर्वोच्च न्यायालयाने याचिकेवरील निकाल ठेवला राखून
minor girl sexually assaulted Vadgaon Maval Sessions Court sentenced accused to 20 years of hard labor and fine
पिंपरी : अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणातील आरोपीला सक्तमजुरी
Malkapur court sentenced accused to life imprisonment for sexually abusing minor girl and getting her pregnant
अल्पवयीन मुलीवर मातृत्व लादले ; आरोपीस जन्मठेप , डीएनए चाचणी निर्णायक
delhi school bomb hoax
४० हून अधिक शाळांना बॉम्बच्या धमक्या, पालकांच्या चिंतेत वाढ; नेमकं प्रकरण काय?
Story img Loader