नागपूर: एकीकडे कोट्यवधी रुपये खर्च करून रस्ते सिमेंटचे करायचे आणि काही महिने जात नाही तोच तेच रस्ते केबल किंवा जल वाहिनी तत्सम कामांसाठी खोदले जात आहे. यामुळे लोकांच्या पैशांचा अपव्यय होत आहे.तेलंगखेडी येथे वर्षभरापूर्वी तयार केलेला सिमेंटचा रस्ता जल वाहिनी टाकण्यासाठी फोडला जात आहे. प्रशासनाकडे नियोजनाचा अभाव यातून दिसून येतो. विशेष म्हणजे महापालिकेकडे अशा कामांना मंजुरी देण्यासाठी समिती आहे.
एखाद्या रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी तेथे जलवाहिनी किंवा टेलिफोन केबल किंवा अशाच प्रकारची काही कामे प्रस्तावित आहेत का? याबाबत माहिती घेतली जाते. मात्र त्यानंतरही रस्ते बांधणी नंतर काही महिन्यातच पदपथ खोदले जात आहे.याबाबत नागपूरचे खासदार व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अनेकदा नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतरही हे प्रकार थांबले नाहीत हे उल्लेखनीय.