नागपूर: २०२४ मध्ये बारामती मध्ये अजित पवार यांचा करेक्ट कार्यक्रम करु, असा दावा भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळें यांनी काल माध्यमासोबत बोलताना केला होता.. त्यावर आज अजित पवार यांनी गुरुवारी उपहासात्मक प्रतिक्रिया देत’ बापरे हे ऐकल्यापासून मला रात्रभर मला झोप लागे ना,’ असे म्हणत बावनकुळे यांना टोला लगावला आहे.
अजित पवार पुढे म्हणाले, एवढा मोठा ताकदीचा नेता मला आव्हान देत आहे. हे ऐकून मी घाबरलो. मला राजकारणच सोडून द्यावेसे वाटते.. बावनकुळे यांच्या म्हणण्यानुसार २०२४ मध्ये होणा-या पराभवामुळे अपमानित होण्यापेक्षा मला राजकारण सोडलेले बरे असे वाटते. असे पवार विनोदाने म्हणाले.
दरम्यान काल भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळे म्हणाले होते की, बारामती येथील माझ्या एका दौ-यामुळे अजित पवार यांच्यावर एवढा फरक पडला की ते माझा करेक्ट कार्यक्रमाची भाशा बोलत आहे. प्रत्यक्षात कुणाचा कार्यक्रम करायचा हे जनता २०२४ मध्ये ठरवेल. २०२४ च्या निवडणुकीत अजित दादांचा करेक्ट कार्यक्रम होईल असे बावनकुळे म्हणाले होते.