अकोला : विविधरंगी प्रकाश उत्सव स्वरमंडळ तारका समूहातून २१ व २२ एप्रिल रोजी पूर्व आकाशात पाहता येईल, अशी माहिती खगोल अभ्यासक प्रभाकर दोड यांनी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आकाशात सूर्य विषुववृत्ताकडून कर्कवृत्ताकडे सरकताना तापमानाचे नवनवे उच्चांक गाठले जातात. पृथ्वीच्या पर्यावरणात घडून येणारे बदल दिवसेंदिवस उग्ररूप धारण करीत आहेत. २२ एप्रिल हा जागतिक वसुंधरा दिन सर्वत्र साजरा केला जातो. या दिवशी उल्का स्वरूपात तुटणाऱ्या ताऱ्यांचा नजारा दरताशी सुमारे २० या प्रमाणात रात्री अकरानंतर पूर्व क्षितिजावर सुरू होईल. पहाटे आकाशमध्याशी असताना वेग वाढेल. पश्चिमेस चंद्रास्त झाल्याने या अनोख्या खगोलीय घटनेचा आनंद अधिक चांगल्या प्रकारे अनुभवता येईल, असे दोड यांनी सांगितले.

हेही वाचा – बुलढाण्यात पक्षीय उमेदवारांसह अपक्षांचीही अग्निपरीक्षा; मतांचे ध्रुवीकरण, विभाजन ठरणार निर्णायक!

हेही वाचा – जिवंत व्यक्ती मृत अन् मृत व्यक्ती जिवंत! चंद्रपुरात मतदार याद्यांचा गोंधळ, नावे नसल्याने मतदार संतप्त

नेहमी रात्रीच्या वेळी उत्तर दिशा दर्शवणारा ध्रुव तारा हा आपण अढळ मानत असलो तरी सुमारे २६ हजार वर्षांत वेगवेगळ्या वेळी बदलणारे ध्रुवतारे उत्तर आकाशात पाहता येतात. हा अनोखा प्रकाश नजारा स्वरमंडळ तारका समूहात सुमारे १२ हजार वर्षांनी बघता येईल. निसर्गाचा समतोल अबाधित ठेवून आकाशातील विविध घटनांचा आनंद घेण्याचे आवाहन प्रभाकर दोड यांनी केले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A colorful sight of meteor showers in the sky from tomorrow ppd 88 ssb