नागपूर : चौफेर वैशाख वणवा पेटला असताना तिकडे ताडोब्याच्या घनदाट जंगलात मात्र वाघाचे जोडपे प्रेमाचा अलवार ‘गारवा’ शोधत आहेत.ताडोबा झरी पेठ / केसलाघाट वनक्षेत्रात मध्ये ‘के मार्क’ वाघीण आणि ‘ज्युनिअर मोगली’ उर्फ ‘ओंकारा’ वाघाच्या अशाच मंदावलेल्या हालचाली टिपल्या आहेत वन्यजीव छायाचित्रकार अभिषेक सिंह यांनी.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/04/WhatsApp-Video-2023-04-13-at-10.01.39-AM.mp4

‘के मार्क’ वाघीण मोहर्ली वनक्षेत्रातकडे जन्मलेली तर ‘ओंकारा’ उर्फ ‘ज्युनिअर मोगली’ हा नवेगाव वनक्षेत्रात जन्मलेला. ‘ मोगली’ आणि ‘झरणी’ चा वंशज असून सध्या त्यांचे वास्तव्य झरी पेठ केसलाघाटकडे स्थापित झाले आहे. वन्यजीव छायाचित्रकार अभिषेक सिंह सफारीकरिता या क्षेत्रात गेले असता, हे दोघे सोबत निवांत वेळ घालवताना आढळून आले. त्या क्षणी टिपलेला हा व्हिडिओ आहे. भविष्यात ‘के मार्क’ वाघिणीला छावे होण्याची शक्यता आहे. देशातील तसेच ताडोब्यातील वाघांची संख्या वाढणे ही आनंदाची बाब असून त्यांचे संगोपन व्यवस्थित होणे हे आपण सर्व नागरिकांचे कर्तव्य आहे, असे प्रतिपादन अभिषेक सिंह यांनी केले आहे. वाघाच्या मस्तकावर ॐ आणि रा देवनागरी लिपित बनलेले आहे, त्यामुळे काही लोक त्याला ‘ओंकारा’ म्हणतात.