नागपूर : स्वत:च्या लग्नासाठी जुळवलेली १२ लाखांची रक्कम तरुणीच्या एका चुकीमुळे सायबर गुन्हेगाराच्या घशात गेली. घरबसल्या काम करून नफा कमावण्याचे आमिष दाखवून सायबर गुन्हेगाराने एका उच्चशिक्षित तरुणीला १२ लाखांनी फसवले. ही घटना तहसील पोलीस ठाण्याअंतर्गत उघडकीस आली. या घटनेमुळे पीडित तरुणीचे कुटुंब आर्थिक संकटात सापडले आहे. या प्रकरणी पोलिसांनी बतुल सैफुद्दीन अली (२५, रा. चमन अपार्टमेंट, इतवारी) यांच्या तक्रारीवरून सायबर गुन्हेगाराविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बतुल अली ही अभियंता असून आई व भावासह राहते. अलिकडेच तिचे लग्न जुळले. लग्नासाठी आईने पैशांची जुळवा- जुळवही केली होती. दरम्यान ७ ऑगस्ट रोजी सायबर गुन्हेगाराने बतुलच्या मोबाईलवर फोन केला आणि पार्ट टाईम जॉबचे आमिष दाखवले. घरबसल्या काम असल्याने बतुलनेही होकार दिला. दिलेल्या मुदतीत काम पूर्ण केल्यास चांगली रक्कम मिळेल, असे आमिष आरोपीने दिले.

हेही वाचा – अमरावती : छायाचित्र प्रसारित करण्‍याची धमकी देत खंडणी उकळण्‍याचा महिलेचा प्रयत्‍न

हेही वाचा – मोलकरीणने बघितला रक्ताच्या थारोळ्यात मृतदेह, भाजपा नेत्या सना खान हत्याकांड

सुरुवातीला बतुलला नफाही मिळाला. त्यामुळे तिचा विश्वास बसला. त्यानंतर आरोपीने जास्त नफा कमवायचा असेल तर अधिक रक्कम गुंतविण्यास सांगितले. तसेच त्याने बतुलकडून तिचा आधार क्रमांक आणि बँक खात्याची संपूर्ण माहिती घेतली. सुरुवातीला मिळालेल्या नफ्यामुळे बतुलचा आरोपीवर विश्वास बसला होता. याचा गैरफायदा घेऊन आरोपी ऑनलाईन परतावा दाखवून अधिकाधिक रक्कम गुंतवायला लावत होता. रक्कम काढण्यासाठीसुद्धा तो पुन्हा रक्कम गुंतविण्यास सांगायचा, अशा पद्धतीने बतुलने तब्बल १२ लाख रुपये गुंतविले. मात्र मूळ रक्कम किंवा नफ्यापैकी काहीही मिळाले नाही. फसवणूक झाल्याचे लक्षात येताच बतुलने पोलिसात तक्रार केली. पोलिसांनी फसवणुकीच्या विविध कलमांशिवाय आयटी अ‍ॅक्ट अन्वये गुन्हा नोंदवून तपास सुरू केला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A cyber criminal duped a highly educated young lady of rs 12 lakhs adk 83 ssb
Show comments