आज समाज प्रगत झाला असला तरी महिला अत्याचारात प्रचंड मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. अशा कठीन स्थितीत महिलांच्या सक्षमीकरणासाठी स्वत:ला झोकुन देत काम करणाऱ्या महिलांची संख्या कमी आहे. महिला सक्षमीकरणासाठी अशीच एक ध्येयवेडी युवती सध्या महाराष्ट्रात सायकलने प्रवास करून महिला सक्षमीकरणाचे काम करीत आहे. या युवतीचे नाव आहे आशा मालविया. कर्जबाजारी शेतकऱ्याची मुलगी असलेल्या या युवतीने महिला सक्षमीकरण तथा शेतकऱ्यांनी आत्महत्या करू नये हा संदेश देण्यासाठी आतापर्यंत सायकलने ९ हजार १६५ किलोमिटरचा प्रवास केला आहे.
ही युवती सध्या चंद्रपूर जिल्ह्यातून प्रवास करत आहे. ती घराबाहेर पडली आहे त्याला सहा महिने झाले.आश्चर्य म्हणजे ९ हजार १६५ किलोमीटरचा प्रवास तिने सायकलवरून केला आहे. केवळ महिला, युवती मध्ये जनजागृती व महिला सशक्तीकरणासाठी ध्येयवेडी युवती काम करीत आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा