अकोला: शहरातील अकोट फैल पोलीस ठाण्यांतर्गत भीम नगर चौक व कुरेशी चौक परिसरात किरकोळ कारणावरून दोन गटात सोमवारी रात्री वाद निर्माण झाला. यावेळी तुरळक स्वरूपाची दगडफेक झाली. पोलिसांनी वेळीच घटनास्थळ गाठून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले. परिसरात तणावपूर्ण शांतता आहे.
भीम नगर परिसरात एका मद्यपी व्यक्तीने शिवीगाळ केली. त्यामुळे परिसरात तणाव निर्माण झाला होता. आपसी वादातून दगडफेक करण्यात आली. या घटनेची माहिती मिळताच अकोट फैल पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेची माहिती वरिष्ठांना देताच घटनास्थळी वरिष्ठ पोलीस अधिकारी दाखल झाले.
हेही वाचा… अमरावती जिल्ह्यात अपघातांच्या प्रमाणात वाढ; अडीच वर्षांत १ हजारांवर बळी
पोलिसांनी परिस्थितीवर वेळीच नियंत्रण मिळवून धरपकड सुरू केली. गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून पुढील तपास अकोट फैल पोलीस करीत आहेत. परिस्थिती निमंत्रणात असून कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.