चंद्रपूर: मुसळधार पाऊस बघता शुक्रवार २८ जुलै रोजी शाळांना सुट्टी जाहीर केल्याचे जिल्हा प्रशासनाचे बनावट पत्र समाज माध्यमावर सार्वत्रिक केल्याने अनेक शाळा, कॉन्व्हेन्ट, महाविद्यालयांनी सकाळी सुट्टी दिली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आता जिल्हा प्रशासनाने असे पत्रच काढले नसल्याचे सांगितल्याने गोंधळ उडाला आहे. विशेष म्हणजे जिल्हा प्रशासन पाऊस येणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तविल्यानंतर सुट्टी जाहीर करते. मात्र त्या दिवशी पाऊस येत नाही. ज्या दिवशी सुट्टी देत नाही नेमका त्याच दिवशी पाऊस पडतो अशी स्थिती येथे आहे.

हेही वाचा… शेतकऱ्यांनो, पिकाचे नुकसान झाल्यास ‘हे’ त्वरित कराच…

जुलै महिन्यात सलग दोन वेळा चंद्रपूर शहर जलमय झाले. त्यामुळे हवामान खात्याने मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविताच जिल्हा प्रशासनाचे प्रमुख या नात्याने जिल्हाधिकारी विनय गौडा आपत्ती व्यवस्थापन विभागाकडून शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेन्टला सुट्टी जाहीर करतात. गुरुवार २७ जुलै रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी अशीच सुट्टी जाहीर केली. मात्र याच पत्रावरील तारखेत खोडखाड करून शुक्रवार २८ जुलै रोजी मुसळधार पावसाचा अंदाज बघता शाळा, महाविद्यालय, कॉन्व्हेन्टला सुट्टी जाहीर केल्याचे पत्र कुणीतरी समाज माध्यमावर सार्वत्रिक केले.

हेही वाचा… मुसळधार पावसामुळे पूर! चंद्रपूर शहरातील अनेक वस्त्या पाण्याखाली, शेकडो घरात पुराचे पाणी, रस्ते बंद

हे पत्र सर्व शाळा महाविद्यालयचे प्राचार्य व प्राध्यापक यांच्या मोबाईलवर पोहचताच सकाळी शाळेला सुट्टी दिली, अनेक शाळांमध्ये सकाळीच स्कूल बस व ऑटोने विद्यार्थी शाळेत पोहचले होते. मात्र सुट्टीची नोटीस बघता सर्व विद्यार्थांना घरी पाठविण्यात आले. त्यानंतर बऱ्याच वेळाने जिल्हा प्रशासनाला हा संदेश फेक असल्याचे निदर्शनास आल्यानंतर सुट्टी जाहीर केली नाही, अशी सूचना देण्यात आली.

हेही वाचा… समृध्दीवरील वाढते अपघात!; नागपूर ते पुणे रेल्वेगाड्या वाढविण्याची भूमिका

काही समाज माध्यमांवरून आज २८ रोजी शाळा महाविद्यालयांना सुट्टी असल्याचा मेसेज व्हायरल होत आहे. जिल्हा प्रशासनाकडून आज २८ जुलै रोजी शाळा महाविद्यालयाच्या सुट्टीबाबत कोणताही आदेश काढण्यात आला नाही. कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी असे जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, चंद्रपूर यांनी स्पष्ट केले. दरम्यान, शाळा व्यवस्थापणाकडून सुट्टी देण्यात आली आहे , सकाळी शाळेत गेलेली मुले परत येत आहेत. माउंट कारमेल स्कूल तसेच इतर शाळांनी सुट्टी जाहीर केली, असे पालकांनी सांगितले.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A fake message that schools and colleges will be closed on 28th today is viral on social media in chandrapur rsj 74 dvr
Show comments