चंद्रपूर: जगप्रसिद्ध ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात वाघांचे कुटुंब एकत्र दिसले. सात वाघ एकाच वेळी दिसण्याचा हा दुर्मिळ प्रसंग कॅमेरा मध्ये टिपण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प नावाच्या सोशल मीडिया पब्लिक ग्रुपवर ७ वाघ एकत्र दाखवणारे एक छायाचित्र शेअर करण्यात आले आहे. सोशल मीडियावर हा फोटो ताडोबाचा असल्याचा दावा केला जात असला तरी ताडोबात हा फोटो कुठे क्लिक करण्यात आला हे स्पष्ट करण्यात आलेले नाही.

हेही वाचा… धक्कादायक! चहा न मिळाल्याने डॉक्टर शस्त्रक्रिया न करता निघून गेले, चौकशी होणार

जंगल यात्री नावाच्या आयडीवरून व्हायरल झालेल्या चित्रात एका पाणवठ्याजवळ एकूण ७ वाघ स्पष्टपणे दिसत आहेत. असे अपेक्षित आहे की हे वाघांच्या कुटुंबाचे चित्र असू शकते, ज्यामध्ये ५ शावक आणि २ प्रौढ नर व मादी वाघांचा समावेश आहे. ७ वाघांना एकत्र पाहिल्याने वाघांना पाहण्यासाठी उत्सुक असलेल्या पर्यटकांच्या आनंदाला पारावार उरला नसल्याचं बोललं जात आहे. ताडोबात वाघांच्या कुटुंबाचे हे छायाचित्र समाज माध्यमावर अतिशय वेगाने सार्वत्रिक झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A family of seven tigers were spotted together at tadoba rsj 74 dvr