यवतमाळ: वणी तालुक्यातील खांदला शिवारात एका शेतात पडून असलेल्या वीज तारांचा स्पर्श होऊन शिरपूर येथील एका शेतमजुराचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्दैवी घटना बुधवारी सायंकाळी घडली. शंकर केशव दुरूतकर (४०) असे मृताचे नाव आहे.

बुधवारी सायंकाळच्या सुमारास मजुरीच्या कामासाठी शंकर खांदला शिवारातील एका शेतातून जात होता. त्यावेळी शेतात पडून असलेल्या जिवंत वीज तारांना त्याचा स्पर्श होताच तो जागीच मृत्यूमुखी पडला. या घटनेला वीज वितरण कंपनीचे अधिकारीच जबाबदार असल्याचा आरोप करीत मृताच्या नातलगांनी मृतदेह घेऊन थेट शिरपूर येथील वीज वितरण कार्यालयावर धडक दिली.

हेही वाचा… आषाढीनिमित्त भाविकांनी फुलली संतनगरी; शेगावात दिंड्यांसह हजारो भाविक दाखल, संध्याकाळी पालखीची नगर प्रदक्षिणा

मृताच्या कुटुंबियांना १० लाख रूपयांच्या मदतीची मागणी केली. रात्री उशिरापर्यंत मृतदेह वीज वितरण कार्यालयासमोरच ठेवून होता. त्यामुळे शिरपूर येथे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

Story img Loader