बुलढाणा: अपुरा पाऊस, मागील पंधरा दिवसांपासून वरुण राजाने मारलेली दडी अन यावर कळस म्हणजे हुमणी अळीचा झालेला भीषण प्रकोप यामुळे निराश झालेल्या शेतकऱ्याने दोन एकरातील सोयाबीनवर ट्रॅक्टर फिरवला. वाढ खुंटलेल्या अळीग्रस्त सोयाबीनमध्ये त्याने जनावरे चरण्यास सोडली आहे.

खामगाव तालुक्यातील आंबेटाकळी येथील श्रीकृष्ण कवळकार या अल्पभूधारक शेतकऱ्याने वैफल्यग्रस्त होऊन आज दुपारी हे पाऊल उचलले. पावसाची सुरुवातीपासून अवकृपा, त्यातच मागील किमान पंधरा दिवसांपासून दिलेली उघडीप, पाऊस न येण्याची चिन्हे यामुळे ते निराश झाले होते. हे कमी म्हणून की काय, शेतातील सोयाबीन पिकावर मोठ्या प्रमाणात हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाला. यामुळे पावसाभावी वाढ खुंटलेले सोयाबीन पीक वाळत होते. त्यामुळे श्रीकृष्ण कवळकार या अल्पभूधारक शेतकऱ्याने आपल्या शेतातील उभ्या सोयाबीन पिकावर ट्रॅक्टर फिरवून या पिकात जनावरे घातली.

incident of clash between two groups took place in Dhairi area on Sinhagad road due to enmity
सिंहगड रस्त्यावर धायरी भागात दोन गटात हाणामारी, परस्पर विरोधी फिर्यादीवरुन गुन्हे दाखल
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Prahlad Joshi statement that the plan of Congress in Karnataka is on the verge of closure Kolhapur news
काँग्रेसच्या कर्नाटकातील योजना बंद पडण्याच्या मार्गावर; प्रल्हाद जोशी
pune puram chowk loksatta
पुणे : पूरम चौकात १६ लाखांचा गुटखा पकडला, टेम्पोचालकाला अटक
Sindhudurg rain
सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पाऊसाची हजेरी, बागायतदार चिंतेत
black leopard maharashtra
Video: महाराष्ट्रात वाढताहेत काळे बिबट…
Uran paddy fields, wild boars damage paddy fields,
उरण : रानडुकरांमुळे भातशेतीचे नुकसान, वन, कृषी विभागाचे दुर्लक्ष; शेतीची राखण करण्याची शेतकऱ्यांवर वेळ

हेही वाचा – मांज्यामुळे जायबंदी झालेला ‘ब्लॅक ईगल’ नैसर्गिक अधिवासात मुक्त; पायाला रिंग लावून घेतली भरारी..

हेही वाचा – अमरावती : रक्‍कम परत मिळवून देण्‍याच्या नावावर ९४ हजारांनी गंडविले; ‘हे’ ॲप मोबाइलमध्ये इन्स्टॉल केले अन्..

हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्यानंतर अनेकदा फवारण्या करूनही अळी आटोक्यात आली नाही. यामुळे छातीवर दगड ठेवून हे पीक उपटून फेकल्याचे कवळकार यांनी सांगितले.