बुलढाणा: एका शेतकऱ्याने जिल्हा कृषी अधीक्षकांच्या दालनातच अंगावर डिझेल ओतून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने घटनास्थळी खळबळ उडाली. एका इसमाने जीवाचा धोका पत्करत त्याला खिशातून आगपेटी काढू दिली नाही आणि भीषण अनर्थ टळला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

गुरुवारी संध्याकाळी थरारक घटनाक्रम घडला. घटनास्थळी दाखल पोलिसांच्या प्राथमिक तपासात शंकर देशमुख असे शेतकऱ्याचे नाव असल्याचे समोर आले आहे. तो अंत्रज (तालुका खामगाव) येथील रहिवासी आहे.

https://www.loksatta.com/wp-content/uploads/2023/07/farmer-suicide.mp4

हेही वाचा… “पती आपल्या पत्नीच्या पोटातून मुलाच्या रुपाने जन्म घेतो”, संभाजी भिडेंचा अजब तर्क

शंकर देशमुख यांनी आपल्या तीन एकर शेतात कपाशीची लागवड केली होती. मात्र या कीडीने आक्रमण केल्याने कपाशीची वाढ खुंटली होती. याची तक्रार जिल्हा कृषी अधिकाऱ्यांकडे केली. मात्र कृषी विभागाने चुकीचा पंचनामा केल्याचा आरोप करीत या शेतकऱ्याने कृषी अधिकाऱ्यांच्या निषेधार्थ त्यांच्या दालनामध्ये अंगावर डिझेल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A farmer tried to commit suicide by pouring diesel on his body in the hall of the district agriculture superintendent in buldhana scm 61 dvr
Show comments