राजुरा तालुक्यातील विरुर स्टेशन वन परिक्षेत्र अंतर्गत येणाऱ्या चिंचोली बीट क्रमांक १४१ मध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक शेतकरी ठार झाल्याची घटना घडली आहे. भीमा प्रभू घुलोत (६०, रा. तुंमागुडा) असे ठार झालेल्या शेतकऱ्याचे नाव आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.
हेही वाचा- नागपूर: माणसावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद; वाहनांच्या धडकेत बिबट्याही जखमी
घुलोत शेतात जागली करीत असताना बिबट्याने त्यांच्यावर हल्ला केला. बिबट्याने त्यांना २०० मीटर अंतरावर फरफटत नेले. यात त्यांचा जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच विरूर स्टेशन वन विभागाचे अधिकारी तेथे पोहचले. वन परिक्षेत्र अधिकारी पवार यांच्या मार्गदर्शनाखाली चिंचोली बीट वनरक्षक राठोड़, तुम्मे, गोविंदवार व इतर कर्मचारी चौकशी करीत आहे.
This quiz is AI-generated and for edutainment purposes only.