यवतमाळ: आत्महत्याग्रस्त जिल्हा ओळख असलेल्या यवतमाळच्या शेतकऱ्यांभोवती स्मानी, सुल्तानी संकटांचा फास दिवसेंदिवस अधिकच घट्ट होत आहे. शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी शासनस्तरावर होणाऱ्या उपाययोजना तोकड्या पडत आहेत. शेतकऱ्यांच्या मनावरील चिंतेचा आणि बँक खात्यातील कर्जाचा बोजा कमी व्हावा, यासाठी शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, अशी मागणी करत एका शेतकरीपुत्राने मुख्यमंत्र्यांना चक्क स्वत:च्या रक्ताने पत्र लिहीले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नागपूर येथे नुकत्याच झालेल्या हिवाळी अधिवेशनात विदर्भातील शेतकऱ्यांना भरीव मदतीची अपेक्षा होती. मात्र, शेतकऱ्यांच्या पदरी निराशाच आली. राज्यकर्त्यांचे शेतकऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी यवतमाळ तालुक्यातील वाई(रू) येथील शेतकरीपुत्र कुणाल गजानन जतकर यांनी स्वतःच्या रक्ताने मुखमंत्र्यांना पत्र लिहून शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफीची मागणी केली आहे. शिवाजी महाराज शेतकऱ्यांच्या पिकाला जरी धक्का लावला तरी हात कलम करण्याची शिक्षा देत होते. मात्र, केंद्र व राज्य सरकार शेतकऱ्यांना मारण्याचे धोरण राबवत आहे, असा आरोप कुणाल यांनी केला आहे. शेतमालाला भाव नसल्याने हतबल झालेल्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देवून न्याय देण्याची मागणी कुणाल यांच्यासह शेतकऱ्यांनी केली आहे.

हेही वाचा… अग्निवीरवायू भरती: या तारखेपासून अर्ज सादर करता येणार

यावर्षी जिल्ह्यात अतिवृष्टी व इतर कारणाने पिकांचे नुकसान झाले. मात्र, शासनाकडून अद्यापही शेतकऱ्यांना पुरेशी मदत मिळालेली नाही. पीक विमा योजनेतही शेतकऱ्यांच्या हाती काहीच आले नाही. पीक विमा कंपन्यांकडून सर्व पिकांचे सर्वेक्षण न झाल्याने बहुतांश शेतकरी नुकसानभरपाईपासून वंचित राहिले. हमीभावापेक्षा कमी दराने पीक विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली. अशा अनेक समस्यांमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A farmers son wrote a letter to the cm with his own blood demanding that the farmers should be given loan waiver yavatmal nrp 78 dvr
Show comments