बुलढाणा : मेहकर तालुक्यातील सोनाटी येथे शेतीच्या वादातून दोघा बापलेकाची हत्या करण्यात आली होती. या हत्येप्रकरणी दोघा आरोपींना मेहकर न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. न्यायाधीश एस. एम. चंदगडे यांनी दोघा आरोपींना कठोर शिक्षा सुनावली असून तीघांची पुराव्याभावी सुटका करण्याचे आदेश दिले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

फिर्यादी जयश्री अशोक सोनटक्के (सोनाटी , तालुका मेहकर) यांचे सासरे दिगंबर सोनटक्के आणि पती अशोक सोनटक्के हे ११ एप्रिल २०१९ रोजी सोनाटी येथील शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करत होते. दरम्यान, बबन वैजिनाथ सोनटक्के, प्रकाश वैजिनाथ सोनटक्के, नंदा बबन सोनटक्के, चंद्रकला प्रकाश सोनटक्के, संदिप प्रकाश सोनटक्के यांनी कुऱ्हाड आणि लाठीने त्यांचे सासरे व पतीस मारहाण केली. दिगंबर सोनटक्के व अशोक सोनटक्के यांना जखमी अवस्थेत मेहकर येथे रुग्णालयात भरती केले असता डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

हेही वाचा – “एक तास माझं घर जळत होते, पोलिसांना मी सतत फोन केले, पण…”, संदीप क्षीरसागरांचा गंभीर आरोप

हेही वाचा – “मी मुख्यमंत्र्यांविरोधात ठाण्यातून लढण्यास तयार”, आदित्य ठाकरेंचे आव्हान, म्हणाले…

गुन्हा दाखल झाल्यावर उपविभागीय पोलीस अधिकारी रामेश्वर व्यंजने यांनी तपास अंती न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकारी वकील जे. एम बोदडे यांनी अकरा साक्षीदार तपासले. जयश्री सोनटक्के या प्रत्यक्षदर्शी साक्षीदार होत्या. साक्षीपुरावे, अ‍ॅड. बोदडे व आरोपींच्या वकिलाने केलेला युक्तिवाद लक्षात घेता न्यायधीश एस एम चंदगडे यांनी निकाल दिला. आरोपी बबन वैजिनाथ सोनटक्के आणि प्रकाश वैजिनाथ सोनटक्के यांना जन्मठेपेची शिक्षा व प्रत्येकी दहा हजार रुपये दंड ठोठावला. नंदा सोनटक्के, चंद्रकला सोनटक्के, संदिप सोनटक्के यांची निर्दोष मुक्तता केली आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A father and son murder due to a farm dispute at sonati in mehkar taluka two accused were sentenced to life imprisonment scm 61 ssb
Show comments