गोंदिया : शहरातील मुख्य बाजारपेठेतील नगर परिषदे समोरील सत्यम व्हिडिओ गल्लीत मध्यरात्री ला १२:३० च्या सुमारास अचानक एका भांडे दुकान आणि लागूनच असलेल्या त्यांच्या गोदामाला अचानक आग लागल्याची घटना घडली . या बाबतची माहिती गोंदिया नगर परिषदेतील अग्नीशमन विभागाला देण्यात आली. त्यांनी लगेच घटनास्थळ गाठून या आगीवर नियंत्रण आणण्यासाठी प्रयत्न केले. पण या आगी ने भांडे गोदामा शेजारील एका जनरल स्टोअर्स च्या दुकानाला पण आपल्या कवेत घेतले असल्याने आगी चे स्वरुप काही काळा पुरते विक्राळ झाले होते. करिता घटना स्थळी आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी गोंदियातील ६ अग्नी शमन दलाच्या गाड्या घटनस्थळी दाखल करण्यात आले होते. तसेच सुरक्षेच्या दृष्टीने तिरोडा नगर परिषदेतील व गोरेगांव नगर पंचायत येथील अग्नी शमन दलाच्या गाड्याना पण मदतीसाठी पाचारण करण्यात आले होते.

अखेर तीन तासा नंतर या विक्राळ होत असलेल्या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्नीशमन दलाला यश आले. अन्यथा मोठी घटना होण्याची शक्यता होती. या आगी मध्ये गुरुनानक बर्तन भंडार व त्यांचे गोदामातील समान आणि ओम जनरल स्टोअर्स मधील शृंगाराच्या ठेवलेल्या साहित्य जळून त्यांची राख रांगोळी झाली असून लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.

12 shops were broken into in one night amateur robbers managed to cover cameras
एका रात्रीत १२ दुकाने फोडली, शौकीन दरोडेखोरांनी कॅमेरे झाकून साधला डाव
AAP defeat in Delhi polls is a setback to Uddhav Thackeray and Sharad Pawar
Delhi Assembly Election: पराभव ‘आप’चा, धक्का उद्धव ठाकरे…
Delhi Metro couple Video couple romance on metro Woman Has A Verbal Fight With A Couple video
मेट्रोच्या गर्दीत कपल गुपचूप करत होतं रोमान्स; तेवढ्यात महिलेनं पकडलं अन् पुढे झाला एकच राडा, VIDEO पाहून तुम्हीच सांगा चूक कुणाची?
Kangana Ranaut New Restaurant In Himalayas
Video : ‘व्हॅलेंटाईन डे’च्या निमित्ताने कंगना रनौत यांची मोठी घोषणा; व्हिडीओ शेअर करत म्हणाल्या, “माझं बालपणीचं स्वप्न…”
Fire breaks out on ground floor of apartment in Akola 11 two-wheelers gutted
अकोल्यात अपार्टमेंटच्या तळ मजल्याला आग; ११ दुचाकी जळून खाक
Shocking video viral
थंडीत काकांनी केले जीवघेणे कृत्य, सिलिंडरला लावली आग अन्… VIDEO मध्ये पुढे काय घडलं एकदा पाहाच
mumbai scrap shops loksatta news
मुंबई : कुर्ला येथे भीषण आगीत भंगार दुकाने जळून खाक
commercial building, Ghatkopar , fire,
मुंबई : घाटकोपरमधील व्यावसायिक इमारतीला भीषण आग

हेही वाचा >>>खरीप गेला, आता रब्बी हंगामावर भिस्त; शेतकरी लागले कामाला

तर ही आग कश्यामुळे लागली हे मात्र अद्याप कळू शकले नाही. सध्या शारदा नवरात्र सुरू असून मोठ्या प्रमाणात देवी बघण्यासाठी लोकं मोठ्या प्रमाणात बाजार परिसरात फिरत असल्याने आग लागल्याचे कळताच आग बघण्यासाठी लोकांनी एकच गर्दी केली होती या गर्दीवर नियंत्रण मिळविण्यासाठी पोलिसांना मोठीकसरत करावी लागली. आग लागल्याची घटनेची माहिती कळताच आमदार विनोद अग्रवाल, माजी नगरसेवक दिलीप गोपलानी,नगर परिषदेतील मुख्याधिकारी करण चौहान आदि घटनास्थळी पोहोचले होते. ही आग आटोक्यात आणण्यासाठी गोंदिया नगर परिषद अग्नीशमन दलाच्या लोकचंद भांडारकर, कमल राखडे, सत्यम बिसेन, मोहनिष नागदवणे, जितेंद्र गौर, मुकेश माने, राजेश भरणे,वाहन चालक कावडे, कनसरे, अजय शहारे, रणजित रहांगडाले आदींनी आपले कर्तव्य बजावले. मध्यरात्रीच्या सुमारास ही आग कशी लागली याची आज तपासणी करण्याकरिता मी स्वतः जाणार असल्याचे नगर परिषद अग्नीशमन विभागाचे प्रमुख अधिकारी लोकचंद भांडारकर यांनी लोकसत्ता शी बोलताना सांगितले.

Story img Loader