चंद्रपूर : बस स्थानकाच्या समोर असलेल्या प्रशासकीय भवनात आग लागल्याची घटना रविवार, ६ ऑगस्ट रोजी पहाटे ५ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. तात्काळ चंद्रपूर मनपा तसेच महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आले आहे.

दोन्ही विभागांचे मिळून ७- ८ अग्निशमन वाहन घटनास्थळी पोहोचले आहेत. ही आग तिसऱ्या मजल्यावर असलेल्या अन्न व औषध प्रशासन विभागाच्या कार्यालयाला लागली असून या कार्यालयात कारवाई करून जप्त करण्यात आलेले अवैध तंबाखू, अंमली पदार्थ व इतर प्रकारचे साहित्य मोठ्या प्रमाणावर असून यातील बरेच साहित्य व कागदपत्रे आगीत स्वाहा झाले असण्याची शक्यता आहे.

Political Parties in Maharashtra Vidhan Sabha Election 2024
रविवार प्रचारवार; घरोघरी भेटी, गृहनिर्माण संकुलांना भेटी, चौक सभा यांना जोर
16 November Aries To Pisces Horoscope Today in Marathi
१६ नोव्हेंबर पंचांग: कृतिका नक्षत्रात मेषला शुभ दिवस,…
crores of rupees seized from car in khed shivapur toll naka area
अन्वयार्थ : हजार कोटी सापडले, त्याचे पुढे काय झाले?
phulambri Fire shop, phulambri, Fire in a shop,
छत्रपती संभाजीनगर : फुलंब्रीतील दुकानात आगीनंतर भडका; तिघांचा मृत्यू, दोघे गंभीर
fire toy shop Amravati, Amravati, fire toy shop,
अमरावतीत खेळणी दुकानाला भीषण आग
Two houses including shop damaged in fire in Fernandiswadi
नाशिक : फर्नांडिसवाडीतील आगीत दुकानासह दोन घरांचे नुकसान
washim assembly constituency dispute within mahayuti
महायुतीमध्ये असंतोषाची दरी, बंडखोरीमुळे वाशीम जिल्ह्यात वाद वाढले; कारवाईत पक्षपातीपणा?
PMPML bus caught fire in swargate depot
स्वारगेट आगारात पीएमपी बसला आग; कर्मचाऱ्यांच्या प्रसंगावधानामुळे आग आटोक्यात

हेही वाचा – शिकाऱ्यांची चंद्रपूर जिल्ह्यावर वक्रदृष्टी, बहेलिया व बावरिया टोळ्यांचे लक्ष

प्रशासकीय भवन या इमारतीत विविध शासकीय कार्यालये आहेत. ज्याठिकाणी दररोज शेकडो लोक शासकीय कामाकरीता येत असतात. एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, जिल्हा माहिती अधिकारी, अन्न व औषधी प्रशासन विभाग, ही महत्त्वाची कार्यालये याच इमारतीत असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर आग लागली आहे. महत्त्वाचे म्हणजे या इमारतीच्या अगदी शेजारीच जिल्हा न्यायालय, दुसऱ्या बाजूला रामनगर पोलीस ठाणे, मागील बाजूला जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय असल्याने हा परिसर महत्त्वाचा व संवेदनशील समजल्या जातो.

हेही वाचा – चंद्रपूर : शेतकऱ्याने चक्क छत्रीच्या साहाय्याने वाघाला पळविले, जनावरांसह वाचविला स्वतःचा जीव

पहाटे फिरण्यास निघालेल्या नागरिकांना प्रशासकीय भवनाच्या दुसऱ्या मजल्यातून मोठ्या प्रमाणात धूर निघत असल्याचे दिसल्याने त्यांनी शहानिशा केली असता तिथे आग लागल्याचे निष्पन्न झाले. काही जागरूक नागरिकांनी तात्काळ अग्निशमन विभागाला आगीची माहिती कळवली. आगीची तीव्रता व इमारतीचे महत्त्व लक्षात घेता मनपा व चंद्रपूर महाऔष्णिक विद्युत केंद्राच्या अग्निशमन दलाने घटनास्थळी धाव घेतली. आगीचे नेमके कारण व वेळ मात्र अजूनही स्पष्ट झालेले नाही.