भंडारा : भरधाव वेगाने आलेल्या टोयाटो ग्लांझा या चारचाकी वाहनाने दोन दुचाकींना एकाच वेळी जबर धडक दिली. या भीषण अपघातात तिघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. ही घटना भंडाराजवळील खुर्शिपार येथे रात्री ९.३० वाजताच्या सुमारास घडली.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

हेही वाचा – पंतप्रधान कुसुम योजना : अडीच हजार शेतकऱ्यांचे अर्ज रखडले, कारण काय? वाचा…

हेही वाचा – भंडारा : वैनगंगा कोपली, इशारा पातळी ओलांडणार….

एका सैन्य अधिकाऱ्याचा मृतांमध्ये समावेश आहे. नागेश्वर बालपांडे, वय ३४, रा. सातोना, हरगोविंद क्षीरसागर, वय ४५ रा. पाहुणी, विनोद भोंदे, वय ४७ रा. मोहदुरा यांचा अपघात मृत्यू झाला. नागेश्वर बालपांडे हे बेलगाम येथे सैन्यदलात कार्यरत असून ते सुट्टीवर गावाकडे आले होते. या अपघातात चारचाकी वाहनातील दोघे गंभीर असून त्यांच्यावर एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. घटनेनंतर नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A four wheeler hit two two wheelers the incident took place at khurshipar near bhandara ksn 82 ssb