नागपूर : शहरात लवकरच ‘आयपीएल’प्रमाणे हॉकीची फ्रेंचायजी आधारित स्पर्धा सुरू होणार आहे. विदर्भ हॉकी असोसिएशनच्या (व्हीएचए) अलिकडेच झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. शहरात हॉकी खेळासाठी सकारात्मक वातावरण निर्मितीसाठी ही फ्रेंचायजी आधारित स्पर्धा महत्वपूर्ण योगदान निभावणार अशी आशा व्हीएचएच्या बैठकीत व्यक्त करण्यात आली. ही फ्रँचायजी आधारित हॉकी स्पर्धा जुलै किंवा ऑक्टोबरमध्ये आयोजित करण्याचा निर्णय घेण्यात आला आ्रहे.

व्हीएचएच्या प्रशासकीपदी नियुक्ती झाल्यावर त्रिलोकी नाथ सिद्रा यांच्या अध्यक्षेत ही बैठक पार पडली. ‘बैठकीत हॉकी इंडियाशी व्हीएचएच्या संलग्नतेशी संबंधित महत्त्वाच्या मुद्द्यांवर देखील चर्चा केली गेली. शहरात फ्रेंचायजी आधारित स्पर्धा आयोजित करण्यासाठी असोसिएशनच्यावतीने आधीच दोन प्रायोजकांशी संपर्क साधला गेला आहे. आयपीएलसारखी ही स्पर्धा दहा संघांमध्ये लीग कम नॉकआउट पद्धतीने खेळवली जाईल. स्पर्धेतील विजेते आणि उपविजेत्यांना भरघोस आकर्षक बक्षीसेही दिली जातील’, अशी माहिती सिद्रा यांनी बैठकीनंतर दिली.

४१ इमारतींवरील कारवाईला वेग ,एकाच दिवसात ४ इमारती जमीनदोस्त
mh370 search operation malaysian airlines
Malasian Airlines: बेपत्ता MH370 चा शोध; पुण्यातील प्रल्हाद…
dilapidated railway bridge on Nagpur Chhindwara route will be opened
नागपूर – छिंदवाडा मार्गावरील खचलेला रेल्वे पुला सुरू होणार,मुहूर्त ठरला
Dharavi Kumbharwada rehabilitation
धारावी कुंभारवाड्याचे मुलुंड कचराभूमीच्या जागेवर पुनर्वसन?; जागा दाखविण्यासाठी नेल्याने रहिवासी संतप्त
fountain , Chandrapur , mosquitoes,
चंद्रपुरातील कारंजी बनली डास उत्पत्ती केंद्र
Bangladesh Settlement name change demand by local residents
ऐकावे ते नवलच! नागपूरच्या एका वस्तीच्या नावाने तेथील हजारो लोकांसमोर संकट…
GBS , Pune, Pune Municipal Corporation,
पुणे : शहरात ‘जीबीएस’चा प्रादुर्भाव वाढल्याने महापालिकेने घेतले मोठे निर्णय!
Hair loss and baldness cases reported in 11 Shegaon villages unsafe water found in Matargaon
टक्कलग्रस्त माटरगावमधील पाणी अपायकारक! ‘नायट्रेट’चे जास्त प्रमाण

हेही वाचा : नियतीचा न्याय! ‘त्या’ बलात्काऱ्याला न्यायालयातून शिक्षा मिळण्यापूर्वीच…

मान्यता मिळविण्यासाठी प्रयत्न

हॉकी इंडियाने २०२० साली व्हीएचएची मान्यता रद्द केली होती. इंडियन ओलम्पिक असोसिएशनच्या एक राज्य,एक संघटना या नियमामुळे व्हीएचएची मान्यता रद्द करण्यात आली होती. ही मान्यता परत मिळविण्यासाठी कायदेशीर लढ्याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. याबाबत संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांच्याशी भेट करण्यासाठी वेळ मागितला होता. क्रीडा मंत्रालयाच्यावतीने सध्या लोकसभा निवडणुका सुरू असल्यानी ही भेट टाळण्यात आली आहे. निवडणुका आटोपल्यावर परत मान्यता मिळविण्यासाठी चर्चा केली जाणार असल्याची माहिती सिद्रा यांनी दिली.

Story img Loader