गोंदिया : जिल्ह्यातील दवनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या बोदा गावात मैत्रीला कलंक लावणारी घटना उघडकीस आली आहे. फक्त ६० रुपयांच्या उसनवारी वरून झालेल्या वादाची परिणीती अशी की मित्रानेच  गळा आवळून खून केला.  रविवारी ८ ऑक्टोबर रोजी दुपार सुमारास ही घटना घडली. आकाश लक्ष्मण दानवे (२१ वर्ष) असे या घटनेतील मृतक चे नाव आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

मिळालेल्या माहितीनुसार, आकाश लक्ष्मण दानवे आणि आरोपी अल्पेश कुवरलाल पटले (२१) रा. दवनीवाडा पोलीस ठाण्याअंतर्गत बोदा गावात राहणारे दोघे मित्र होते.  आणि मजुरीसाठी एकत्र जायचे.  या कालावधीत  आकाश ने  आरोपीं अल्पेश कडून ६० रुपये उसने घेतले होते.  रविवार ८ ऑक्टोबर रोजी दुपारी आरोपी अल्पेश ने आकाशाकडे त्याच्या उधारीच्या पैशाची मागणी केली. त्यावर आकाश आज सायंकाळी “फोन पे”  वरून परत करणार असल्याचे सांगितले, मात्र या क्षुल्लक बाबी वरुन अल्पेशचा राग अनावर झाला आणि त्याने आकाश च्या त्यावर बोलण्यावर विश्वास न ठेवता त्याच्या छातीवर बुक्की ने वार करून त्याचा गळा आवळला, जमिनीवर पाडले. त्यामुळे काही क्षणातच आकाश बेशुद्ध होऊन कोसळला, त्यानंतर त्याला तातडीने जवळील सेजगाव येथील एका खासगी डॉक्टरांकडे उपचारासाठी नेण्यात आले.

हेही वाचा >>> “पेपर नीट घेणे झेपत नसेल तर राजीनामा द्या, महाराष्ट्र कसा सांभाळता?”; स्पर्धा परीक्षा समन्वय समितीचा सवाल

मात्र त्यांची प्रकृती अत्यंत चिंताजनक असल्याने त्यांना पुढील उपचारासाठी तिरोडा उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तेथे डॉक्टरांनी त्यांना तपासून मृत घोषित केले. या बाबत ची माहिती कळताच अत्री, बोदा, दवनीवाडा हा संपूर्ण परिसर हादरला. घटनेची माहिती मिळताच दवनीवाडा पोलिसांनी तत्काळ कारवाई करत आरोपी अल्पेश कुंवरलाल पटले याला काही तासातच ताब्यात घेतले.  या प्रकरणाचा तपास करून खुनाचा गुन्हा दाखल करण्याची कारवाई दवनीवाडा पोलिस ठाण्याचे प्रभारी सतीश जाधव यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे. आरोपी अल्पेश ला आज सोमवारी न्यायालयात हजर केले जाणार आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A friend murder by borrowing 60 rupees crime in gondia sar 75 ysh
Show comments