धनाढ्य निपुत्रिक दाम्पत्यांना नवजात बाळांची विक्री करणाऱ्या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या असून नवनवीन आरोपींची संख्या वाढत आहे. या टोळ्यांना तोतया डॉक्टर मदत करीत आहेत. बाळ विक्री करणाऱ्या टोळ्यांनीच अनेक तोतया डॉक्टर तयार केले आहेत.

हेही वाचा- अमिताभ बच्चन यांच्या घरासमोर बॉम्ब? निनावी फोनबाबत विचारणा केली असता पोलीस म्हणाले…

57 lakh worth of goods seized in Nashik district in two days nashik news
नाशिक जिल्ह्यात दोन दिवसात ५७ लाखांचा मुद्देमाल जप्त
Manoj Jarange Patil on Kalicharan
‘हिंदुत्व तोडणारा राक्षस’, कालीचरण यांच्या विधानानंतर मनोज जरांगे…
kama Hospital study shows increased diabetes prevalence in pregnant women due to changing lifestyles
गर्भधारणेच्या वेळी महिलांना मधुमेहाचा धोका
ambulance
गर्भवती महिलेचा थोडक्यात वाचला जीव! रुग्णवाहिकेतील ऑक्सिजन सिलेंडरचा स्फोट, थरारक Video कॅमेऱ्यात कैद
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
Greater Noida
Greater Noida : डोळ्यावर शस्त्रक्रिया न करताच हॉस्पिटलने ४५ हजार उकळले; दुसऱ्या डॉक्टरनी तपासल्यानंतर झालं उघड
Mom delivers baby by herself while riding in the car to the hospital Shocking video
चमत्कारावर विश्वास नसेल तर ‘हा’ VIDEO पाहा; कारमध्ये महिलेला प्रसूती कळा सुरु झाल्या अन् पुढे जे घडलं त्यावर विश्वास बसणार नाही
Garlic Rate, Vegetable Rate, Pune, Garlic,
लसूण महागला, परराज्यातील लसणाची आवक कमी

मुंबई, पुणे, नाशिकसह अन्य ७ राज्यातील धनाढ्य निपुत्रिक दाम्पत्यांना नवजात बाळांची ८ ते १२ लाख रुपयांना विक्री करणाऱ्या टोळ्यांचा छडा गुन्हे शाखेच्या मानवी तस्करी विरोधी पथकाने (एएचटीयू) लावला होता. उपराजधानीतून सर्वाधिक ५५ आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करून ११ ते १२ नवजात बाळांना एएचटीयू पथकाने शोधून काढले तर आणखी काही टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. गुन्हे शाखेच्या पथकाच्या कारवाईनंतर नागपुरातील काही टोळ्यांना अटक करण्यात आली तर काही टोळ्यांनी काम बंद करून नागपुरातून पळ काढला. पोलीस तपासात गुंतल्याचे बघून या टोळ्या पुन्हा सक्रिय झाल्या. त्यांनी काही तोतया डॉक्टरांच्या टोळ्या तयार केल्या आणि त्यांना बनावट रुग्णालय टाकून दिले. अविवाहित, विधवा आणि बाळ नको असलेल्या गर्भवतींना मोठमोठे आमिष दाखवण्याचे काम तोतया डॉक्टर आणि परिचारिका करीत आहेत. रुग्णवाहिका चालकाचा तोतया डॉक्टर झालेला विलास भोयर, आयेशा खान, मौर्य, राजेश्री सेन, मकबुल खान, सचिन पाटील, सीमा परवीन, फरजाना अन्सारी आणि पिंकी लेंडे या सर्वांनी स्वतःला डॉक्टर आणि परिचारिका असल्याचे भासवून अनेक गर्भवतींवर उपचार केले.

हेही वाचा- गंभीर आजारांनी ग्रस्त रुग्णांसाठी मुनगंटीवार ठरले देवदूत; मिळवून दिले तब्बल २ कोटी ७३ लाखांचे पंचतारांकित उपचार

अवैध गर्भपातासाठी ‘लागेबांधे’

आयेशा ऊर्फ श्वेता खान, राजेश्री सेन या महिलांच्या टोळ्या गर्भवतींचा शोध घेतात. त्यांना बाळाला जन्म घालायला लावतात. ते बाळ परराज्यात ८ ते १२ लाखांत विकतात. अशाप्रकारे महिन्याकाठी जवळपास ३ ते ४ बाळांची विक्री केल्याची माहिती समोर आली आहे.

नवजात बाळ विक्री करणाऱ्या टोळ्यांवर पोलिसांनी अंकुश घातला आहे. आणखी काही टोळ्या पोलिसांच्या रडारवर आहेत. टोळीला मदत करणारे तोतया डॉक्टरांवरही लक्ष आहे. या टोळ्या नष्ट करण्यासाठी नागपूर पोलीस प्रयत्न करीत आहेत, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली.