बुलढाणा: चौघांचा समावेश असलेल्या चोरट्यांच्या टोळीने वाघजाळ येथे धुडगूस घालून तिघांना मारहाण केली आणि लाखाचा ऐवज लुटला. मोताळा तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्रीनंतर हा थरारक घटनाक्रम घडला असून आज शनिवारी (दि. १६) सकाळी प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.

मध्यरात्रीच घटनास्थळी दाखल झालेले बोराखेडी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. फिर्यादी सागर शिंबरे (३७, वाघजाळ ता. मोताळा) यांचे गावाजवळून जाणाऱ्या मार्गालगत घर आहे. शुक्रवारी मध्यरात्री चार जणांच्या टोळीने मागील बाजूने घरात प्रवेश केला. यावेळी घरात झोपलेले शिंबरे, त्यांची पत्नी, मुलाने आरडाओरड करू नये म्हणून, त्यांना लोखंडी रॉडने मारहाण करण्यात आली. यानंतर घरातील चांदी, सोन्याचे दागिने व १७ हजार रोख असा ऐवज घेऊन टोळी पसार झाली.

Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी
Balu Dhanorkar mother, Vatsala Dhanorkar claim,
खळबळजनक! खासदार बाळू धानोरकरांचा घातपात, आईच्या दाव्याने शंका कुशंका
Attempted murder of laborer due to argument over drinking
दारू पिताना झालेल्या वादातून मजुराचा खुनाचा प्रयत्न, भिडे पूल परिसरातील घटना

हेही वाचा… बदलीसाठी महिला कर्मचाऱ्याकडे शरीरसुखाची मागणी, अधिकाऱ्याविरोधात गुन्‍हा दाखल

अज्ञात चोरट्यानी काळे कपडे घातले होते व तोंडाला कपडे बांधले होते. ते २५ ते ३५ वयोगटातील होते, अशी माहिती शिंबरे यांनी दिली. बोराखेडी पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी मध्यरात्रीच गावात दाखल झाले. अज्ञात चोरट्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक यशवंत आठवले व सहकारी करीत आहे.