बुलढाणा : मेहकर येथून चोरीस गेलेले मालवाहक वाहन (ट्रक) हस्तगत करण्यात पोलीस विभागाला यश मिळाले आहे. ही अवजड चोरी करणाऱ्या संभाजीनगर येथील सहा जणांच्या टोळीला जेरबंद करण्यात आले आहे.

मेहकर येथील वरद पेट्रोलपंपमध्ये पार्किंग केलेला ट्रक २४ ऑक्टोबरच्या मध्यरात्रीला अज्ञात चोरट्यांनी चोरून नेला. या अवजड चोरीमुळे खळबळ उडाली होती. फैजल शाह यांनी फिर्याद दिली. मेहकर पोलिसांसमोर तपासाचे आव्हान उभे ठाकले होते.

ATM money theft pune, thief caught pune,
पुणे : एटीएममधून रोकड चोरणाऱ्या चोरट्याला पकडले; सुरक्षारक्षक, वाहतूक पोलिसांची तत्परता
BJP Devendra Fadnavis Assets Net Worth Updates in Marathi
Devendra Fadnavis Income : उपमुख्यमंत्र्यांची एकूण संपत्ती किती?…
Pune Loot, bikers robbed pune, pune crime news,
पुणे : शहरात लुटमारीचे प्रकार वाढीस, दुचाकीस्वार तरुणांना लुटले
Haryana for atm robbery pune
पुणे: एटीएम फोडून रोकड चोरणारी हरयाणातील टोळी गजाआड, स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरूर पोलिसांची कामगिरी
6 feet long snake entered the MIDC police station
पोलीस ठाण्यात साप आणि पोलिसांची तारांबळ
Nagpur mahametro under bridge
नागपूर : महामेट्रोच्या दिव्याखाली अंधार; भुयारी मार्गात दिवसा काळोख, अधिकारी सुस्त
vip roads for ordinary pune residents
लोकजागर : सामान्य पुणेकरांना ‘व्हीआयपी’ रस्ते मिळतील का?
Accused who surrendered in Kalyaninagar accident case remanded in police custody Pune
कल्याणीनगर अपघात प्रकरणात शरण आलेल्या आरोपीला पोलीस कोठडी

हेही वाचा – बुलढाणा, नागपूर जिल्ह्यात सर्वाधिक वीज देयकांची थकबाकी

पोलीस अधीक्षक सुनील कडासने यांनी स्थानिक गुन्हे शाखा व मेहकर पोलिसांचे संयुक्त तपास पथक गठीत केले. स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक लांडे व मेहकरचे ठाणेदार राजेश शिंगटे यांनी तपासाची चक्रे फिरविली.

हेही वाचा – वर्धा : पोषण आहार आता बचत गटाकडे

जिल्ह्यातील व पर जिल्ह्यातील गुन्हेगारांचे ‘रेकॉर्ड’ तपासले. तसेच अन्य माहितीचा आधार घेण्यात आला. या परिणामी संभाजीनगरच्या टोळीला पथकाने जेरबंद केले. यामध्ये अकबर शहा, सैय्यद समीर, सैय्यद सिकंदर, सैय्यद जुनेद, इरफान खान, सादिक शेख यांचा समावेश आहे. टोळीकडून ट्रक व एक वाहन जप्त करण्यात आले.