नागपूर : सदरमधील जुन्या विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानाच्या समोर पदपाथावर गॅस फुग्याची विक्री करणाऱ्या विक्रेत्याच्या सिलेंडरचा स्फ़ोट झाला.या स्फ़ोटात ५ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला तर कुटुंबातील तीन जण जखमी झाले. ही घटना रविवारी रात्री ९:३० मिनिटांनी घडली.सज्जान आसिफ शेख असे मृत मुलाचे नाव आहे. अनमता आसिफ शेख (२४, मानकापूर), आरिया शेख आणि फारिया शेख अशी जखमींची नावे असल्याची माहिती सदर पोलिसांनी दिली.
रविवारी रात्री ९.३० वाजता मानकापुरात राहणारे शेख कुटुंब कार ने घरी जात होते. सदरमधील जुना विदर्भ क्रिकेट संघटनेच्या मैदानाजवळ रस्त्याच्या बाजूला गॅसचे फुग्यांची विक्री करीत होता. मुलगा सज्जान ने गॅस चा फुगा घेऊन मागितला. त्यामुळे कुटुंबियांनी कार थांबवली आणि मुलाला फुगा घेऊन देण्यासाठी गेले. फुग्यात गॅस भरत असताना अचानक सिलेंन्डरचा स्फ़ोट झाला. त्यामध्ये फुगा घेण्यासाठी सिलिन्डर च्या बाजूला उभा असलेला मुलगा सज्जान पूर्णपणे भाजला. तर मुलाच्या बाजूला उभे असलेलि आई, मावशी आणि नातेवाईक महिला गंभीर जखमी झाले. स्फ़ोटाचा आवाज एकून् अनेकांनी मदतीसाठी धाव घेतली. नागरिकांनी लगेच सदर पोलिसांना कळवले. मेयो रुग्णालयात दाखल केले. परंतु रुग्णालात पोहचण्यापूर्वीच मुलाचा मृत्यू झाला. तर तिची आई आणि मावशी वर उपचार सुरु आहेत. या प्रकरणी सदर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून फुगे विक्रेता फरार झाला आहे.
हेही वाचा >>>जीव मुठीत धरून शाळकरी विद्यार्थ्यांचा नदीपात्रातून प्रवास !
फुगे विक्रेता झाला फरार
सिलींडरचा स्फोट होऊन ते हवेत उडाल्यानंतर सजानच्या डोक्यावर पडले आणि दोन महिला जखमी झाल्याचे पाहून फुगे विक्रेत्याने आपली मोपेड घेऊन घटनास्थळावरून पळ काढला. सदर पोलिसांनी फुगे विक्रेत्याच्या मोपेडचा क्रमांक मिळवून त्याचा शोध सुरु केला आहे.