नागपूर : प्रेम हे कोणत्याही वयात होऊ शकतं, परंतु प्रेम आणि शारीरिक आकर्षण यामधील फरकही न कळणाऱ्या दहावीतील मुलगी आणि मुलाने लग्न करून सुखी संसाराचे स्वप्न रंगवले. दोघांनीही शाळेत जाण्याच्या बहाण्याने पलायन केले. मात्र, पाचपावली पोलीस आणि एएचटीयूने दोघांनाही ताब्यात घेतले. प्रेमीयुगुल आणि पालकांचे समूपदेश करीत गुंता सोडविला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दीपाली आणि पवन (वय १६, काल्पनिक नाव) हे दोघेही दहाव्या वर्गात शिकतात. दीपालीचे वडील व्यवसाय करतात तर आई खासगी नोकरी करते. पवन हा वाईट संगतीत वाढलेला मुलगा असून तो आजीकडे राहतो. त्याच्या आईवडिलांचे आपसात पटत नसल्यामुळे कौटुंबिक वातावरण त्याला लाभले नाही. दोघेही एकाच वर्गात असल्यामुळे वर्षभरापूर्वी दोघांची मैत्री झाली. शिकवणी वर्गात दोघेही सोबत जात असताना दोघांमध्ये प्रेमसंबंध निर्माण झाले. सध्या दोघेही दहावीत असून एकमेकांच्या प्रेमात आकंठ बुडाले आहेत. आर्थिक स्थितीने कमकुवत असलेल्या पवनला दीपाली ही वडिलांच्या पैशातून मदत करीत होती. दीपालीच्या पैशातून चित्रपट, हॉटेल आणि कपडेसुद्धा घेत होता. वाईट संगतीत लागल्यामुळे पवनच्या आईने त्याच्यावर आरडओरड करीत अभ्यासाकडे लक्ष देण्यास सांगितले. अभ्यास न केल्यास घराबाहेर हाकलून देण्याची धमकी दिली. ती बाब पवनने प्रेयसी दीपालीला सांगितली. तिने पळून जाऊन स्वतःचा सुखी संसार थाटण्याची कल्पना सूचवली. दोघांनी लग्न करून बाहेर राहण्याचे ठरविले. त्यासाठी दीपालीने वडिलांचे काही पैसे सोबत घेतले. दहावीत शिकत असलेल्या दोघांनीही लग्न करण्यासाठी घरातून पळ काढला.

हेही वाचा – भाजपामधून काँग्रेसमध्ये आलेला आमदार अडकणार? सना खान हत्याकांडात आणखी दोघांना अटक

दीपाली आणि पवनने लग्न करण्याच्या उद्देशाने घरातून पळ काढला. भाड्याने खोली मिळविण्यासाठी आटापीटा सुरू केला. खोली मिळत नव्हती म्हणून एका मित्राकडे मुक्काम करण्याचे ठरविले. मात्र, त्याच्या आईने दोघांनाही हाकलून दिले. हॉटेलमध्येही आधार कार्ड दाखविण्याची अट ठेवल्याने रूम मिळाली नाही. दोघांनीही दोन दिवस शहरात भटकंती केली.

हेही वाचा – नागपुरात अमली पदार्थांचा पुरवठा, नवी कार्यपद्धती, नवी ठिकाणे आणि बरेच काही

पोलिसांनी घेतले ताब्यात

दोघांच्याही कुटुंबियांनी पाचपावली आणि यशोधरानगर ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार दिली. एएचटीयूच्या प्रमुख रेखा संकपाळ आणि पाचपावलीचे ठाणेदार वैभव जाधव यांच्या पथाकांनी मुलांचा शोध सुरू केला. एएचटीयू पथकाने दोघांनाही नागभूमी परीसरातून ताब्यात घेतले. तेथून पाचपावली ठाण्याच्या ताब्यात दिले. पोलिसांनी मुलांसह पालकांचे समूपदेशन केले आणि पुढील कायदेशीर प्रक्रिया सुरू केली.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A girl and a boy of class 10 ran away on the pretext of going to school adk 83 ssb