अकोला : जिल्ह्यातील एक १४ वर्षांची बालिका अत्याचाराला बळी पडून गर्भवती राहिली होती. न्यायालयाचा आदेश मिळवून तिचा गर्भपात घडवून आणला. त्यासाठी येथील ‘सखी वन स्टॉप’ केंद्राने प्रयत्न केले.

जिल्ह्यातील एका अल्पवयीन १४ वर्षीय बालिकेवर नराधमाची वाईट नजर पडली. त्याने तिच्यावर बळजबरीने अत्याचार केला. या अत्याचारामुळे बालिका गर्भवती राहिली होती. सुरुवातीला तिच्या आई-वडिलांना हे कळले नव्हते. आई-वडिलांना त्याची माहिती मिळताच मुलीला घेऊन त्यांनी पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलीस पीडितेला घेऊन जिल्हा स्त्री रुग्णालयातील सखी वन स्टॉप केंद्रात गेले. त्याठिकाणी वैद्यकीय तपासणीनंतर व डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली बालिकेवर प्रथमोपचार व तपासणी करण्यात आली. पुढील उपचारासाठी तिला शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात पाठविण्यात आले.

violence erupts in manipur after recovery of bodies
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; तीन मृतदेह सापडल्यानंतर नागरिक संतप्त; राजकीय नेत्यांच्या घरांवर हल्ले
Nana Patole On Devendra Fadnavis :
Nana Patole : निकालाआधी राजकीय घडामोडींना वेग; यातच…
Bombay HC Nagpur Bench News
High Court : अल्पवयीन पत्नीशी संमतीनं ठेवलेले शरीरसंबंधही बलात्कारच; मुंबई हायकोर्टाचं १० वर्षांच्या शिक्षेवर शिक्कोमोर्तब
Supreme Court order Uttar Pradesh government regarding bulldozer operation
अग्रलेख: नक्की काय बुलडोझ झाले?
chatura cesarean delivery
स्त्री आरोग्य: गर्भजल कमी असल्यास ‘सिझेरियन’ अनिवार्य आहे?
minor boy stabbed his mother
कोवळ्या वयात एवढा राग…मुंबईत अल्पवयीन मुलाकडून आईवर चाकूने हल्ला, महिलेवर शीव रुग्णालयात उपचार सुरू
Violence against women increase, conviction rate
महिला अत्याचार वाढले….पण, गुन्ह्यातील दोषसिद्धीचे प्रमाण मात्र……

हेही वाचा – नागपूर : खळबळजनक..! संशयातून पत्नीने पतीवर फेकले अ‍ॅसिड

बालिकेच्या पालकांनी गर्भपात करण्यासाठी केलेल्या विनंती अर्जानुसार बाल कल्याण समितीने तत्काळ जिल्हा बाल संरक्षण अधिकारी यांना न्यायालयात याचिका दाखल करण्याचे आदेश दिले. उच्च न्यायालयाने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या वैद्यकीय मंडळाकडून अहवाल मागवला. वैद्यकीय मंडळाने तिचा गर्भपात धोकादायक नसल्याचा अहवाल सादर केला. त्यानुसार उच्च न्यायालयाने बालिकेच्या गर्भपाताला मंजुरी दिली. पूर्ण वैद्यकीय देखरेखीत बालिकेचा गर्भपात करण्यात आला.

हेही वाचा – नागपूर : इंस्टाग्राम मित्राने केले तरुणीशी अश्लील चाळे

या संपूर्ण प्रक्रियेत महिला व बाल विकास विभाग, बाल कल्याण समिती अध्यक्ष ॲड. अनिता गुरव, सदस्य ॲड. शीला तोष्णीवाल, सदस्य प्रांजली जयस्वाल, सदस्य राजेश देशमुख, विनय दांदळे व जिल्हा बाल संरक्षण अधिकारी राजू लाडूरकर, विधी सल्लागार ॲड. विलास काळे, सखी वन स्टॉप केंद्राच्या केंद्र प्रशासक ॲड. मनिषा भोरे, समन्वयिका हर्षाली गजभिये यांनी प्रयत्न केले.