अमरावती : येथील इर्विन चौक परिसरातील एका नामांकित शाळेतील शिक्षकाने इयत्ता पाचवीत शिकणाऱ्या मुलीच्या शरीराला आक्षेपार्ह स्पर्श करून (बॅड टच) विनयभंग केल्याचा प्रकार घडला आहे. या प्रकरणी आरोपी शिक्षक मर्विन हेंड्री जोसेफ (३५, रा. तपोवन, अमरावती) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा – “तिला सुखरूप माहेरी जावू द्या…”, पत्नीच्या त्रासाला कंटाळून पतीची आत्महत्या
हेही वाचा – स्मशानात पाणी, लाकडे ओली; नागपुरात अंत्यसंस्कारासाठी अडचणी
याबाबत शाळेच्या प्राचार्यांच्या तक्रारीच्या आधारे शहर कोतवाली पोलिसांनी आरोपी शिक्षकाच्या विरोधात गुन्हा नोंदविला आहे. पीडित मुलीने सुरुवातीला तिच्या कुटुंबीयांना या प्रकाराची माहिती दिली. पालकांनी शाळेतील प्राचार्यांना भेटून तक्रार दिली. त्यानंतर प्राचार्यांनी संबंधित शिक्षकाला बोलावून समज दिली. पालकांनी या शिक्षकाच्या विरोधात कारवाई करा, असे सांगितले. पण, सायंकाळी पालकांनी शिक्षकाच्या विरोधातील तक्रार मागे घेतली. त्यानंतर शाळा समितीने शाळेतील इतर विद्यार्थिनींना विश्वासात घेऊन वस्तुस्थिती जाणून घेतली. अखेरीस प्राचार्यांनी शिक्षकाच्या विरोधात तक्रार दाखल केली. या घटनेमुळे पालकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे.