नागपूर : नागपुरात मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्यासाठी प्रत्येकी एक स्वतंत्र निवासस्थान आहे. मात्र आता राज्यात दोन उपमुख्यमंत्री आहेत. त्यामुुळे हिवाळी अधिवेशन काळात दुसरे उपमुख्यमंत्री राहणार कुठे असा प्रश्न होता. प्रशासनही पेचात पडले होते. त्यातून आता मार्ग काढण्यात आला आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

नागपुरात सिव्हील लाईन्समध्ये मुख्यमंत्र्यांसाठी ‘रामगिरी’ तर उपमुख्यमंत्र्यांसाठी ‘ देवगिरी ’ ही शासकीय निवासस्थाने आहेत. ‘देवगिरी’ हा बंगला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पूर्वीच  देण्यात आला. त्यानंतर राष्ट्रवादीने महायुतीत प्रवेश केला व या गटाचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाले. त्यामुळे त्यांच्यासाठी नागपुरात निवासस्थानाचा शोध सुरू झाला. सिव्हील लाईन्समधील  एक शासकीय बंगला ( ३१/१)  अजित पवार यांच्यासाठी अधिकृत निवासस्थान म्हणून निश्चित करण्यात आला. सध्या हा  बंगला नागपुर पोलीस सह-आयुक्तांचे निवासस्थान आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A government bungalow in civil lines was fixed as the official residence for ajit pawar nagpur cwb 76 amy