बुलढाणा: तालुक्यातील धाड नगरीत छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभे राहत आहे. या स्मारकाच्या पायाभरणीत छत्रपतींशी संबधित गड व वास्तूंची पवित्र माती आणि जलाचा वापर करण्यात येणार आहे.
या स्मारकाच्या पायाभरणीत राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेब यांचे जन्म स्थळ सिंदखेडराजा, महाराजांचे जन्मस्थळ किल्ले शिवनेरी, शिवरायांनी हिंदवी स्वराज्याची शपथ घेतली ते रायरेश्वर व हिंदवी स्वराज्याची राजधानी किल्ले रायगडावरील ‘पवित्र माती आणि जल’चा वापर करण्यात येणार आहे. माती आणि जल आणण्यासाठी छत्रपती शिव-शंभू स्मारक समितीचे पदाधिकारी व शिवभक्त आज ५ नोव्हेंबर रोजी रवाना झाले आहे.
हेही वाचा… यवतमाळ: अफलातून चोर! दुचाकी चोरायचा अन खड्ड्यात…
माती आणि जल असलेले मंगल कलश धाड मध्ये दाखल झाल्यानंतर प्रत्येक गावातून मंगल कलश दर्शन रथयात्रा काढण्यात येणार आहे. कलश रथयात्रा जात असलेल्या प्रत्येक गावातील माती संकलीत करुन ती देखील शिवस्मारकाच्या पायाभरणीसाठी वापरण्यात येणार आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष वैभवराजे मोहिते यांनी ही माहिती दिली.