वर्धा : रक्तदानाचे असंख्य शिबिरे होत असूनही रक्ताची चणचण वैद्यकीय क्षेत्रात नेहमीच भासत असते. त्यावर उपाय म्हणून येथील युवकांच्या चमूने केव्हाही हाकेला ओ देत विविध रक्तगटांची जणू बँकच स्थापन केली आहे. शहीद भगतसिंह विद्यार्थी परिषदेच्या सदस्यांनी हा अभिनव उपक्रम कोरोना संक्रमण काळात सुरू केला.

कोरोना काळात लोकं रुग्णालयात जाण्यास पण तयार होत नव्हते. यावेळी नीरज बुटे व त्याच्या युवा मित्रांनी प्रत्यक्ष डॉक्टरांना फोन करीत मदत देण्याची तयारी दर्शवित सहकार्यपण केले. काही युवकांनी तर दर तीन महिन्यांतून एकदा तर काहींनी वर्षातून तीनदा रक्त देत जीव वाचविले.

sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: विद्यार्थ्यांच्या शिक्षणासाठी ‘आधार माणुसकीचा’!
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
sant gadgebaba sevabhavi sanstha ambajogai
सर्वकार्येषु सर्वदा: गरजू मुलांच्या शिक्षणासाठी मदतीची गरज
america parents punished for kids crime,
विश्लेषण: अल्पवयीन मुलांच्या गंभीर गुन्ह्यांसाठी पालकांनाच अटक? अमेरिकेतील दोन राज्यांचा अनोखा पायंडा… भारतात काय स्थिती?
e vehicle prices will remain under control even without subsidy says nitin gadkari
अनुदानाविनाही ई-वाहनांच्या किमती आटोक्यात राहतील -गडकरी
Education problem of Dalits is forever before due to caste system now due to economy
दलितांचा शिक्षणप्रश्न कायमच, आधी जातीव्यवस्थेमुळे, आता अर्थव्यवस्थेमुळे!
Why will families migrate from tiger protected areas
वाघांच्या संरक्षित क्षेत्रांतील कुटुंबांचे स्थलांतरण का होणार? समस्या काय? आव्हाने कोणती?
retirement planning, financial freedom, emotional aspects, senior financial planning, peace of mind, financial mentor, heritage, family values, mental preparation,
निवृत्तीच्या उंबरठ्यावरचं अर्थकारण!

हेही वाचा – कधीकाळी राजीनामा देणारे कर्तव्यनिष्ठ ‘आयएएस’ अधिकारी वैभव वाघमारे पुन्हा चर्चेत, गडचिरोलीतील धडाकेबाज कारवाईने राज्यात खळबळ

सावंगी व सेवाग्राम येथील रुग्णालय तर या युवकांवर भिस्त ठेवून आहे. कोरोना काळात केलेल्या प्रशंसनीय कामगिरीबद्दल या संघटनेचा जिल्हा प्रशासनाने गौरव केला होता. ए निगेटिव्ह या दुर्मिळ समजल्या जाणाऱ्या रक्तगतासाठी तर याच संघटनेवर अवलंबून राहावे लागत असल्याची स्थिती आहे. अश्या पाचशेवर रक्तदात्यांची नोंदच करून ठेवण्यात आली आहे.

हेही वाचा – कसा राहणार समृद्धीनंतरचा नागपूर-गोवा शक्तीपीठ महामार्ग? किती खर्च येणार? काय फायदा? जाणून घ्या

आम्ही ऑन कॉल केव्हाही उपलब्ध असल्याचे नीरज सांगतो. जेव्हा अधिकृत ब्लड बँकेत रक्त उपलब्ध नसते, तेव्हा पहिली हाक यांनाच घातल्या जात असल्याचे रुग्णालयाचे डॉक्टर सांगतात. नियमित रक्तदाते म्हणून प्रामुख्याने शंतनू भोयर, अभी राऊत, दुष्यंत ठाकरे, अभय भिंगारे, सूरज जयस्वाल, अक्षय फुलकरी, राहुल दंढारे, किशोर सोनी, निखिल ठाकरे, अमर देशमुख, हर्षल थोरात, परवेज शेख, अनिकेत भोयर यांची नोंद आहे.