बुलढाणा: बिल काढण्यासाठी चाळीस हजारांची लाच स्वीकारताना शेगाव येथील आरोग्य कर्मचाऱ्यास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले. रुग्णालय परिसरात ही कारवाई करण्यात आली.
मंगेश जोशी असे आरोपीचे नाव असून तो शेगाव येथील सईबाई मोटे उप जिल्हा रुग्णालयात कनिष्ठ लिपिकपदी कार्यरत आहे. तक्रारदाराचे आश्वासित प्रगती योजनेच्या फरकाचे ‘बिल’ काढण्यासाठी त्यावर वैद्यकीय अधीक्षक यांची सही घेऊन ते लेखा विभागाकडे पाठविण्यासाठी त्याने ४० हजाराची मागणी केली. गुरुवारी रुग्णालय परिसरात सापळा रचून त्याला ४० हजारांची रक्कम स्वीकारताना पकडण्यात आले.
हेही वाचा – विधानभवन परिसरात सत्ताधारी पक्षाच्या आमदारांकडूनच आंदोलन, काय आहे कारण जाणून घ्या…
उपअधीक्षक शीतल घोगरे यांच्या मार्गदर्शनाखाली सचिन इंगळे, प्रवीण बैरागी, भांगे, जगदीश पवार, स्वाती वाणी, नितीन दंडे यांनी ही कारवाई केली.