ब्रिटिशकालीन महाराजबाग प्राणिसंग्रहालयात नवीन प्राण्यांचे आगमन झाले आहे. बिलासपूर येथील कानन पेंढारी झूलॉजिकल उद्यानातून हॉग डिअर व दोन लांडोर बुधवारी या प्राणिसंग्रहालयात आणण्यात आले.
हेही वाचा- नागपूर: राज्यपाल भगतसिंह कोश्यारीं यांच्याकडे तक्रार, … असे आहे प्रकरण
महाराजबाग प्राणिसंग्रहालयात दोन नर मोर होते. प्राणिसंग्रहालयाच्या नियमानुसार येथे लांडोर आणण्यात आले. या प्रक्रियेत प्राणिसंग्रहालय नियंत्रक डॉ. प्रकाश कडू यांच्या आदेशानुसार महाराजबाग प्राणिसंग्रहालयाचे प्रभारी अधिकारी डॉ. सुनील बावस्कर यांच्या निर्देशनात पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. अभिजीत मोटघरे, पशुधन पर्यवेक्षक महेश पांडे तसेच प्राणीपाल हरीलाल तिरमले, सिद्धनाथ चौधरी व रामजीत यादव सहभागी होते. तसेच कानन पेंढारी येथील अजय यादव व राकेश यादव यांचे मोलाचे सहकार्य लाभले.