चंद्रपूर: ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पात दरवर्षी पर्यटकांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने जिप्सी वर नियंत्रण ठेवणे ताडोबा व्यवस्थापनासाठी कठीण होऊन बसले आहे.वाघ दाखविण्यासाठी पर्यटक जिप्सी चालक व मार्गदर्शक यांना अतिरिक्त पैसे देत असल्याने दररोज नियमांचे उल्लंघन होत आहे. दरम्यान २०२३-२०२४ या वर्षात ४ लाख सहा हजार पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली आहे. यातून ताडोबा व्यवस्थापनाने १४ कोटींचे उत्पन्न मिळविले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ताडोबा प्रकल्पातील जिप्सी चालक व मार्गदर्शक नियम धाब्यावर बसवून कशा प्रकारे पर्यटकांना वाघाचे दर्शन घडवीत आहेत हा प्रकार गेल्या काही दिवसांपासून सातत्याने समोर येत आहे. १७ एप्रिल रोजी जिप्सी नी वाघाला घेरून ठेवल्याचे छायाचित्र सार्वत्रिक झाल्यानंतर ताडोबा व्यवस्थापनाने २५ जिप्सी व मार्गदर्शक यांच्यावर कारवाई केली. मात्र त्यानंतर देखील असा प्रकार घडत आहे.त्याला प्रमुख कारण पर्यटकांची वाढती संख्या व पर्यटकांमध्ये वाघ बघण्यासाठी कुठलाही स्तर गाठण्याची तयारी आणि जिप्सी चालक व मार्गदर्शक यांच्यात बळावलेली टीप संस्कृती आहे. ताडोबा प्रकल्पात यावर्षी ४ लाख ६ हजार पर्यटकांनी भेट दिली आहे.

हेही वाचा >>>नात्याला कलंक! शारीरिक अत्याचारानंतरही पीडिता फितूर; तरीही न्यायालयाने…

ताडोबात दररोज १५० पेक्षा अधिक जिप्सी पर्यटकांना घेऊन जातात. तर ६ क्रुझर वाहने देखील सोडली जातात. दररोज हजारो पर्यटक ताडोबात येत असल्याने त्यातूनच नियमांचे उल्लंघन होत आहे. गेल्या पाच वर्षात पर्यटकांची संख्या सरळ २ लाखाने वाढली आहे.वर्ष २०१८-२०१९ मध्ये १ लाख ८१ हजार ४६७,  २०१९-२०२० मध्ये २ लाख २२ हजार ९३२ , २०२०- २०२१ मध्ये १ लाख ६२ हजार ८२२ तर २०२१-२०२२ मध्ये १ लाख ९७ हजार ५८४, २०२२ – २०२३ मध्ये ३ लाख १९ हजार ६६८ पर्यटकांनी ताडोबाला भेट दिली आहे. ताडोबा प्रकल्पाला यावर्षी सर्वाधिक एकूण १४ कोटी २० लाख ३३ हजार ९१३ रुपयांचा महसूल मिळाला आहे. महसूल अधिक कमविण्याच्या स्पर्धेत येथे पर्यटनाला अधिक महत्त्व दिले जात आहे. त्यामुळे वाघाला घेरण्याचे प्रकार वाढीस लागते आहे.

जिप्सी प्रकरणात केवळ वाहन चालक,  मार्गदर्शक यांच्यावर कारवाई करण्यात आली आहे. मात्र वन परिक्षेत्र अधिकारी, वनरक्षक यांच्यावर कुठल्याही प्रकारे कारवाई केली गेली नाही जिप्सी व मार्गदर्शक यांच्यावर लक्ष ठेवण्याचे काम अधिकाऱ्यांचे आहे. जिप्सी चालक,  मार्गदर्शक नियमांचे पालन करीत आहे की नाही याची नोंद अधिकारी ठेवतात.परंतु या प्रकरणात अधिकारी नामानिराळे राहिले आहे. जिप्सी चालक यांचे केवळ एक निलंबन व दंड आकारण्यात आहे. अशा घटना वारंवार होऊ नये यासाठी पर्यटनावर नियंत्रण ठेवणे आवश्यक झाले आहे.

Nagpur News (नागपूर / विदर्भ न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: A huge increase in the number of tourists in tadoba andhari tiger reserve rsj 74 amy
Show comments