गेल्या रविवारी निर्माल्य नदीपात्रात विसर्जित करीत असताना ३० फूट उंचीच्या पुलावरून एक महिला नदीपात्रात पडली होती. त्यावेळी महिलेचा पतीसोबत होता. ती महिला नदीपात्रात पडल्यानंतर तिच्या पतीने शिरपूर होरे या गावात जाऊन घडलेली घटना ग्रामस्थांना सांगून माझ्या पत्नीचा शोध घ्या, अशी विनंती केली. ही सर्व घटना ऐकून शिरपूर होरेच्या ग्रामस्थांनी तिच्या पतीला घेऊन नदीकडे धाव घेतली. रात्री १० वाजताच्या दरम्यान अंधारात टॉर्चच्या प्रकाशात त्या महिलेला शोधण्यास सुरुवात केली. ती महिला एका लाकडी खोडाच्या साह्याने नदीपात्रात पकडून जीवित दिसून आली. नंतर ग्रामस्थांनी एका बोटीच्या सहाय्याने तिला सुखरूप बाहेर काढले.
हेही वाचा- नागपूर : वाहतूक पोलिसांनी दंडाऐवजी पैसे घेतल्याचा ‘व्हिडिओ व्हायरल’
महिलेचे नाव नीलम कैलास नागपुरे व तिचे पती कैलास गोपाल नागपुरे, रा. सुभाषनगर नागपूर. हे दोघे व ४ वर्षांचा त्यांचा मुलगा आयन हे नागपूर वरून आपल्या चारचाकी वाहनाने यवतमाळ जिल्ह्यातील एका मंदिरात नवस फेडण्याकरिता गेले होते. यवतमाळवरून परत येताना निर्माल्य नदीपात्रात विसर्जन करण्याकरिता शिरपूर होरे गावाजवळील वर्धा नदीच्या पुलावर रात्री थांबले होते.
हेही वाचा- वाशीम : सिनेस्टाईल उपसरपंचाचे अपहरण करून हत्या
पत्नी निर्माल्य नदीपात्रात टाकताना तोल न सांभाळता आल्यामुळे नदीपात्रात पडली, असे पती कैलास गोपाल नागपूरे याचे म्हणणे होते. परंतु, त्याची पत्नी नीलम कैलास नागपुरे हिने घटनेच्या तीन दिवसानंतर देवळी पोलीस ठाण्यात येऊन पती विरोधात तक्रार दाखल केली की माझ्या चारित्र्यावर संशय घेऊन माझ्या पतीनेच मला धक्का देऊन नदीपात्रात ढकलले, असा आरोप केला. आरोपी कैलास गोपाल नागपुरे याला अटक करून कोठडीत टाकण्यात आले आहे.